बावधन मधीन लेखक, साहित्यिक, कवी व पत्रकार श्रीनिवास गडकरी यांच्या तब्बल दोन पुस्तकांच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच झाले. त्या बद्दल साहित्यिक वर्तुळात त्यांचे अभिनंदन करण्यात येतं आहे.
” इतिहास जपणारी गावे ” व ” कालचं काही ” अशी ही दोन पुस्तके असून त्याची प्रथम आवृत्ती पुण्याच्या बुक मार्क पब्लिकेशन ने दोन हजार बारा साली काढली होती. लवकरच दोन्ही पुस्तकांच्या आवृत्या संपून गेल्या. कोरोनाने लांबलेले पुढच्या आवृत्तीचे काम अलीकडेच पार पडले असे प्रकाशक पराग पिंपळे यांनी सांगितले.
इतिहास जपणारी गावे या पुस्तकात शीर्षका प्रमाणेच काही गावातील इतिहासाचा मागोवा घेतला आहे. पण तो घेत असताना तोच तोच माहित असलेला इतिहास नं घेता नवीन काही मिळतंय का याचा शोध घेतला गेला आणि तसं अभ्यासंती मिळतंही गेलं. असं लेखक श्रीनिवास गडकरी यांनी सांगितलं. या पुस्तकात काही गावं अशी आहेत की ज्यांचा केवळ उल्लेख ऐतिहासिक कागद पत्रात मिळतो पण ती गावं आत्ता अस्तित्वात नाहीत. विविध कारणांनी उठली, उजाड झाली किंवा धरणात बुडीत झाली.हे खरं तर मी सदर स्वरूपात एका पेपरात वसर्षभर लिहीत होतो. त्याला खूप जोरदार प्रतिसाद होता. पुढे त्याला पुस्तक रूप मिळालं असं गडकरी सांगतात.
” कालचं काही ” या पुस्तकात मागच्या जमान्यातील जातं, पाटा वरवंटा, चूल, उखळ मुसळ अश्या वस्तू बद्दल लिहिले आहे. वाचत असताना जुन्या जमान्यात फेर फटका मारल्याचा आनंद मिळतो. खेरीज हे संस्कृती जतन आहे.
दुसऱ्या आवृत्ती निमित्त श्रीनिवास गडकरी यांचे सर्वात्र अभिनंदन होत आहे.