You are currently viewing प्रज्ञा सूर्य

प्रज्ञा सूर्य

*ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, संपादक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*प्रज्ञा सूर्य*

 

शहरे खेड्यांमधून उसळला निळा जनसागर

निळे अंबर, निळा सागर या भारत भूमीवर

जय भीम चा देत नारा जनता झाली एक स्वर

एक त्राता विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर

-१-

संविधान देशाचे दिले महामानवाने उपकार

स्वातंत्र्य, समता, बंधूता त्रिसूत्री याचा मंत्र आधार

प्रज्ञा सूर्य तळपला मिटला अज्ञानाणा अंधःकार

नत झाली कोटी शिरे अंतरी कृतज्ञता अपार

-२-

शिका, संघटीत व्हा नि अन्यायाविरुद्ध करा एल्गार

आदर्श नव युवकांचे नव समाजाचे झाले अंगार

शतकांची अढी कसली विसरा मनातला विखार

सूक्ष्म अंतराय सुशिक्षितांचा तो बेकीचा व्यवहार

-३-

तोडा फोडा राजनीती ने केला भेदभाव जातींवर

झुंजू नका आपसात ओऴखा कावा तुम्ही वेळेवर

अस्मिता अनाठायी नका करू उगाच भाव आपपर

दीनदुबळ्यांचे कैवारी कर्तृत्वाने जाहले अमर

-४-

 

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

द्वारा डॉक्टर साई प्रसाद कुमठेकर

अनिका पिकॅडिली

ए-५०३

पुनावळे बाजार, पुनावळे, पुणे ४११०३३

मो. 9890567468

प्रतिक्रिया व्यक्त करा