*डिगस, आवळेगाव, सिंधुदुर्गनगरी, पोखरण येथील वर्षानुवर्षे प्रलंबित विकासकामांना सुरुवात*
कुडाळ :
आज आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यातील डिगस इजिमा-४४ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ३० लाख, आवळेगाव पाटकरटेंम्ब जरीमरी मंदिर जाणारा रस्ता करणे-०५ लाख तर सिंधुदुर्गनगरी जिल्हा कारागृहाकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे-२८ लाख या कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कामांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती, निलेश राणे यांनी आमदार झाल्यानंतर तत्काळ दखल घेत निधी उपलब्ध करून दिला याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी शिवसेना नेते संजय पडते, दादा साईल, अरविंद करलकर, नित्यानंद कांदळगावकर, रमेश घोगळे, पूर्वा सावंत, अमित तावडे, मनोरंजन सावंत, महादेव सावंत, विनायक अनावकर, प्रशांत परब, सुप्रिया वालावलकर, पांडुरंग मालवणकर आदी उपस्थित होते.