स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना SOF आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड परीक्षा स्पर्धेत घवघवीत यश :
सावंतवाडी
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड परीक्षा स्पर्धेत घवघवीत यश मिळवले. या परीक्षेत प्रशालेतील एकूण १०१ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी इयत्ता १ ली मधील कु. पर्णिका देसाई, इयत्ता २ री मधील कु. आद्या उमेश कुंभार, इयत्ता ३ री कु. प्रार्थना प्रणय नाईक, इयत्ता ४ थी मधील कु. सई सुधीर नाईक, इयत्ता ५ वी मधील कु. प्रत्युषा प्रसाद घोगले, इयत्ता ६ वी मधील कु. स्पृहा अमेय आरोंदेकर या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. तर, इयत्ता १ ली तील कु. श्रीहान सन्नी पोकळे, इयत्ता २ री मधील आनंदी उमेश धोंड, इयत्ता ३ री मधील कु. शिवेन मयुर पेडणेकर, इयत्ता ४ थी मधील कु. ऐश्वर्या सागर तेली, इयत्ता ५ वी मधील कु. देवांग महेश सारंग, इयत्ता ६ वी मधील कु. अस्मी धीरज सावंत या विद्यार्थ्यांनी शाळेतून दुसरा क्रमांक पटकावला. तसेच, इयत्ता १ ली तील कु. अर्जुन अमोल भिसे, इयत्ता २ री तील कु. क्रिशा कौस्तुभ साळवी, इयत्ता ३ री तील कु. वेद हरेश बेळगावकर, इयत्ता ४ थी मधील कु. राधेश यशवंत नाईक, इयत्ता ५ वी मधील कु. मनवा प्रसाद साळगावकर, इयत्ता ६ वी मधील कु. सोहम सचिन देशमुख या विद्यार्थ्यांनी शाळेतून तिसरा क्रमांक पटकावला. या परीक्षा स्पर्धेत वरील विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देऊन, तर सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या परीक्षा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रशालेतील गणित विषयाच्या सहा. शिक्षिका सौ. प्राची साळगावकर व सौ. ग्रिष्मा सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी वरील परीक्षेत सहभागी सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.