You are currently viewing वंदन करतो तुजला

वंदन करतो तुजला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यांजली रचना*

 

*वंदन करतो तुजला*

 

महामानवा करते

वंदन तुझिया ठायी

नमतो पायी

माथा।।

 

सुवर्णाक्षरांनी लिहावे

कार्य आपले महान

करावे गुणगान

किती।।

 

लिहिली राज्यघटना

न्याय समता,बंधुता

अधिकार रक्षिता

सकलांचे।।

 

नाकारला मनुवाद

पंचशील बौध्दधर्म स्विकारला

दुर्बलांना दिला

आशावाद।।

 

हक्क सुधारणा

लिहिले भारताचे संविधान

हक्क समान

स्रीपुरूषांस।।

 

प्रज्ञासूर्य आपण

आभाळाहून आहात थोर

नतमस्तक समोर

आम्ही!!🙏

 

〰️〰️〰️〰️🍁🍃〰️〰️

अरुणा दुद्दलवार …दिग्रस

यवतमाळ

प्रतिक्रिया व्यक्त करा