You are currently viewing दरवळं तुझा…….

दरवळं तुझा…….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

दरवळं तुझा…….

दरवळं तुझा तो हवाहवासा स्पर्श मुलायम मोकळा
गोड किती आलिंगन तुझे ग सोनचाफ्याचा मळा..

केवड्याचा गंध येतो मधुमालती दरवळते
मंदगंध मालतीचा निशिगंधही परमाळते…

कस्तुरी तू नाभीतील तरीही धावतो तुझ्यासवे
वेड लागे जीवनाला सातत्य वाटे हवेहवे..

सोनचाफा केवड्याचा गंध भरला जीवनी
ग अशी ठसली मनी तू तुजवाचून दुनिया सुनी…

प्रहर सारे व्यापले तू नाही मी आता एकटी
अंतर्यामी गूढ तुझे बहिण माझी धाकटी….

हात धरला तू असा की फारच ठरली लकी
तुझ्यावाचूनी दुनिया माझी फारच आहे फिकी…

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा