You are currently viewing दुर्लक्ष करून जाते घरी

दुर्लक्ष करून जाते घरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*दुर्लक्ष करून जाते घरी*

जिकडे तिकडे पाणी नळाला
पाणी वहाते ती डोक्यावरून
असे कसे हो निर्लज्ज सरकार
पाणी आणते ती किती दुरून
//1//
कुठे उलथल्या पाणीयोजना?
75 झाली “स्वातंत्र्य” मिळून
पैसा “रिचवला” पाणी द्यायला
आक्षेप न आला पाण्यावरून
//2//
किती योजना भाकड ठरल्या
पाणी न आले स्वयंपाक घरात
डोळे पुसून महिला *थकल्या*
वाहून आणती *वृध्दा* उन्हात
//3//
कुठे बालके *शाळा* गाठती
ठेवून *सरकारांवर* *विश्वास*
पाने पुसती अंदाज *पत्रकातून*
शिव्या शाप देऊन *मंत्र्यास*
//4//
बसून खुर्चीवर मंत्री मंडळात
आश्वासनांचा पाडती पाऊस
झटक्यात वाढती पगार यांचे
नडत नाही *असून आवस*
//5//
पाणी आणते जरी अनवाणी
ब्र ही नाही काढीत म्हातारी
जो तो मरतो आपल्या पापाने
*दुर्लक्ष* करून जाते *घरी*
//6//

विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा