You are currently viewing सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगारातर्फे १ मे  कामगार दिनी वेंगुर्ला आगाराच्या गेट वर आमरण उपोषणाबाबत आगार व्यवस्थापक नोटीस

सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगारातर्फे १ मे  कामगार दिनी वेंगुर्ला आगाराच्या गेट वर आमरण उपोषणाबाबत आगार व्यवस्थापक नोटीस

सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगारातर्फे १ मे  कामगार दिनी वेंगुर्ला आगाराच्या गेट वर आमरण उपोषणाबाबत आगार व्यवस्थापक नोटीस

वेंगुर्ला

सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगारातर्फे १ मे २०२५ कामगार दिनी वेंगुर्ला आगाराच्या गेट वर आमरण उपोषणाबाबत नोटीस आज ०९/०४/२०२५ रोजी आगार व्यवस्थापक यांना देण्यात आली

वेंगुर्ला आगारातील वाहतूक निरीक्षक श्री विशाल देसाई, तसेच सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री जयंद्रथ सासोलकर, यांच्या मनमानी कारभाराबाबत कारवाई करण्यासंदर्भात २६जानेवारी २०२५ रोजी संघटने मार्फत आगाराच्या गेटवर उपोषण करण्यात आले होते त्या वेळी मा.वेंगुर्ला तहसिलदार साहेब, जिल्हा बँक अध्यक्ष मा.श्री मनीष दळवी साहेब, तसेच विभागीय अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करण्यात येईल असे सांगून उपोषण मागे घेन्यास सांगण्यात आले होते, परंतु ३ महिन्याचा कालावधी संपत आला असून देखील कोणतीही कारवाई अथवा त्या संदर्भात लेखी पत्र संघटनेला देण्यात आले नाही, उलट संघटनेच्या पदाधिकारी, सभासद यांच्यावर कारवाई तसेच आगारात काम करत असताना मानसिक त्रास देण्याचे काम संबंधित अधिकारी व आगार व्यवस्थापक यांच्या मार्फत करण्यात आले.
*एखाद्या चालक वाहकानी वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत उद्धट वर्तन केल्यास त्यांच्यावर ताबडतोब कारवाई होते मग एखाद्या अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ करून देखील ३ महिन्यात त्यावर कोणतीच कारवाई होत नाही याचे आश्चर्य चालक वाहकाना वाटत आहे, आगारातील अधिकारीच सांगत असतील एस टी महामंडळ नियमात चालत नाही आणि अधिकारीच नियम पायदळी तुडवून काम करत असतील तर नियम फक्त चालक वाहकांसाठीच आहेत काय असा सवाल कर्मचारी करत आहेत* .
वेंगुर्ला आगारातील वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक तसेच आगार व्यवस्थापक यांच्या चुकीच्या कारभारामुळे वेंगुर्ला आगार तोट्यात आला असून यापूर्वी सिंधुदुर्ग विभागात उत्पन्नाच्या बाबतीत एक नंबर ला असणारा डेपो आज पूर्णपणे तोट्यात गेलेला आहे यासाठी वेंगुर्ला आगार प्रशासन जबाबदार आहे. चालक वाहक हा महामंडळाचा उत्पन्नाचा घटक असून त्यांच्यावरच वेळोवळी कारवाईची टांगती तलवार ठेवून आगाराचे उत्पन्न घटवण्याचे कार्य वेंगुर्ला आगार प्रशासन करीत आहे.
संबंधित अधिकारी श्री विशाल देसाई, तसेच श्री जयंद्रथ सासोलकर यांनी केलेल्या गैरवर्तणुकी बाबत तसेच वेंगुर्ला आगार प्रशासन सुस्थितीने चालून चालक वाहकांवर होणारा अन्याय थांबावा या करिता संविधानिक मार्गाने १ मे २०२५ कामगार दिनी वेंगुर्ला आगाराच्या गेटवर सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघातर्फे आमरण उपोषण करीत आहेत.
यावेळी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ विभागीय सचिव श्री भरत सीताराम चव्हाण, वेंगुर्ला आगार सचिव, श्री दाजी तळवणेकर, श्री महादेव भगत, श्री मनोज दाभोलकर, श्री निखिल भाटकर उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा