You are currently viewing राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी 

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत  शनिवार दि. 10 मे 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक यांनी दिली आहे.

             जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र सवरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग तसेच सर्व तालुका न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नेमुन घेणेबाबत पक्षकारांना आवाहन करण्यात येत आहे.

             तडजोड होऊ शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी दि. 10 मे 2025 चे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवावयची असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवावययाचे आहे,असे संबंधित अधिक्षक अथवा लिपिक तसेच संबंधित वकिल यांना कळवावे. लोक अदालतीत तडजोड झाल्याने कायमस्वरुपी वाद मिटू शकेल, शुल्लक वादाचे पर्यावसन कायमस्वरुपी वादात होणार नाही,वैराने वैर वाढतच राहते असे होऊ नये, यासाठी सामंजस्य घडवावे हाच लोक अदालतीचा हेतू आहे. शिवाय लोक अदालतीतील निकालाविरुध्द अपिल होत नाही, वेळ व पैशांची बचत होते.

             या लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी, कौटुंबिक वाद मोटार अपघात भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे इ. प्रकरणे ठेवावयाची असल्यास संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.बी. गायकवाड यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा