You are currently viewing कुडाळ येथे उद्यापासून योग शिबीर

कुडाळ येथे उद्यापासून योग शिबीर

कुडाळ येथे उद्यापासून योग शिबीर*

कुडाळ

येथील कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर १३ ते १७ एप्रिल या कालावधीत पहाटे ५.३० ते ७.३० या वेळेत निःशुल्क योग शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला पतंजली योगपीठ (हरिद्वार) चे मुख्य केंद्रीय प्रभारी पूज्य स्वामी डॉ. परमार्थ देवजी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

पतंजली योग समिती, भारत स्वाभिमानट्रस्ट, युवा भारत, सोशल मीडिया, किसान सेवा समिती व महिला पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयरोग, लठ्ठपणा, गॅस, पोटाचे विकार, कंबरदुखी, मधुमेह, अॅलर्जी, दमा, मायग्रेन, डोकेदुखी, सांधेदुखी आदी रोगांच्या निवारणासंबंधी योग आणि आयुर्वेदिक आधारित अभ्यास घेतला जाणार आहे. योग साधकांनी या शिबिराला रोज येताना योगा मॅट किंवा हातरुमाल, पाणी बाटली सोबत आणावी. या मोफत योग प्राणायाम शिबिराला सर्वांनी सहपरिवार उपस्थित राहवे. अधिक माहितीसाठी पतंजली योग समिती (सिंधुदुर्ग) चे जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर व भारत स्वाभिमान (सिंधुदुर्ग) चे जिल्हा प्रभारी डॉ. तुळसीराम रावराणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा