You are currently viewing जागतिक आरोग्य दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून कारागृहातील बंध्यांसाठी मोफत आरोग्य शिबिरचे आयोजन.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून कारागृहातील बंध्यांसाठी मोफत आरोग्य शिबिरचे आयोजन.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून कारागृहातील बंध्यांसाठी मोफत आरोग्य शिबिरचे आयोजन.

सावंतवाडी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेमार्फत अनेक समाज हिताचे उपक्रम राबवले जातात.
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून कारागृहातील बंध्यांसाठी या संस्थेमार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 65 जणांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कारागृह अधीक्षक सतीश कांबळे व वरिष्ठ तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे यांनी कौतुक केले तसेच ज्येष्ठ नागरिक अरुण मिस्त्री यांनी आपले मनोगत व्यक्त करता म्हणाले की सामाजिक बांधिलकीचे अनेक सेवाभावी उपक्रम आपण नेहमी पाहतो परंतु या उपक्रमाने आपण भारावून गेलो संस्था तन-मन-धन या गोष्टीचा योग्य समन्वय राखून समाजामध्ये निराधार, पीडित, गरजू, हॉस्पिटल क्षेत्र,तसेच शैक्षणिक क्षेत्रातील होतकरू विद्यार्थ्यांना मदत हा त्यांचा गुणधर्म आहे आणि आज हा उपक्रम राबवला तो खरोखरच कौतुकास्पद आहे आजच्या धावपळीच्या युगामध्ये सर्व प्रकारच्या सामाजिक क्षेत्रात सातत्य ठेवून वावरणे एवढं सोपं नसतं परंतु त्यांनी हे करून दाखवलं याचा मला सार्थक अभिमान वाटतो.
तर प्राध्यापक रुपेश पाटील यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कामाला सलाम केला आणि कारागृहामधील बंध्यांचे मनोबल वाढणारे प्रेरणादायी भाषण केले.तर संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हणाले बंध्यांच्या येथून सुटकेनंतर पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर ऍड. पूजा नाईक (विधी सेवा समिती ) यांनी बंध्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.
उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव रूपा मुद्राळे शरदनी बागवे लक्ष्मण कदम समीरा खलील हेलन निबरे यांनी कष्ट घेतले.
उपस्थित डॉक्टरांची नावे कारागृह अधीक्षक सतीश कांबळे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे, प्रभारी पी आय ओतारी ऍड पूजा जाधव नाईक (विधी सेवा समिती) ज्येष्ठ नागरिक अरुण मिस्त्री, प्राध्यापक रुपेश पाटील,आपला दवाखान्याचे आरोग्य अधिकारी डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. निखिल अवधुते, आयुर्वेदिक कॉलेजचे डॉ. नंददीप चौडणकर, जिल्हा रुग्णालयाचे अक्षय नाईक,अदिती कशाळीकर एनसीडी समोपदेशक उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांनी कारागृहातील 48 बंद्यांना व कर्मचारी मिळून एकूण 65 जनांवर मोफत उपचार करून मोफत औषधे उपलब्ध करून दिली, यामध्ये जनरल चेकअप, हृदय व डायबिटीस चेकअप, डोळ्यांचा चेकअप, हाडांचा चेकअप, रक्तगट तपासणी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. यासाठी डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर,अहिल्या मेडिकलचे मालक आनंद रसम व उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्यामार्फत विनामूल्य औषधे उपलब्ध उपलब्ध.
या शिबिरासाठी आपला आरोग्य दवाखाना अधिकारी डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर व जिल्हा रुग्णालय ओरोसचे अधीक्षक डॉ. पाटील सर व उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.ऐवळे यांचे विशेष योगदान लाभले तर आपला दवाखान्याचे सिस्टर तृप्ती अंधारी, स्मिता नाटेकर,गंगा सुतार, यशवंत परब, फार्मासिस्ट दिनार पडते यांचेही योगदान लाभले.
याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे,सचिव समीरा खलील, शरदिनी बागवे,रूपा मुद्राळे, हेलन निबरे, समिता बागवे , रवी जाधव, लक्ष्मण कदम, व कारागृह कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा