पणन महामंडळाच्या मुख्याधिकार्यांची “बोवलेकर कॅश्यू” फॅक्टरीला भेट….
सुरेश बोवलेकर यांच्याकडुन स्वागत; ड्रम रोस्टेड काजू प्रक्रियेचे कौतुक…
वेंगुर्ले
येथील प्रसिध्द बोवलेकर कॅश्यु फॅक्टरीला पणन महामंडळाचे मुख्य अधिकारी विनायक कोकरे यांनी काल भेट दिली. यावेळी कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या ड्रम रोस्टेड काजू प्रक्रियेचे त्यांनी कौतूक केले. यावेळी कंपनीचे मालक सुरेश बोवलेकर यांनी कोकरे यांचे बोवलेकर कॅश्यू परिवाराच्या माध्यमातून स्वागत केेले. श्री. जोशी हे पणनमंत्र्यांच्या दौर्याच्या पाश्वर्भूमिवर जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी बोवलेकर कॅश्यू फॅक्टरीला भेट दिली. यावेळी त्यांच्या सवमेत त्यांचे सहकारी मिलींद जोशी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी काजू कारखानदारांना येणार्या विविध अडचणी समजावून घेतल्या आणि याबाबत योग्य ते ठोस निर्णय होण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले तसेच त्यांनी कंपनीत फिरुन ड्रम रोस्टेड काजू प्रक्रियेबाबत माहिती घेतली तसेच या प्रक्रियेमुळे काजू हा डिंक विरहीत होतो. त्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांना होतो. त्यामुळे या पध्दतीचे कौतूक केलेे.