You are currently viewing करि धरियेली

करि धरियेली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्मा सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*करि धरियेली*

 

शब्दांचे सूर्य जेव्हा

लेखणीची ताकद बनतात |

विश्व शस्त्रास्त्रे तेव्हा

अप्रतिम अक्षर बनतात ||१||

 

लिहित्यांचे शब्दास्त्र

दुधारी विलसत असते |

विश्व बदलण्याचे

सामर्थ्य खास त्यात असते ||२||

 

अविचाराग्नीत पडते

विश्व संहाराची ताकद ठेवते |

विनाशकाले असे

विवेकालाच कसे जाळते ||३||

 

लिहिण्याआधी वेचून

अखंडीत साहित्य वाचावे |

सुखेनैव वाचलेले

जन हितार्थ शुद्ध लिहावे ||४||

 

जया करि झरणी

मनी शुद्ध विचार धर्म |

करी सहाय्य लेखणी

अचूक भेदण्यास अधर्म ||५||

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता. – वेंगुर्ला,

जि.- सिंधुदुर्ग, राज्य- महाराष्ट्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा