You are currently viewing रातराणी

रातराणी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रातराणी*

 

गुलाब हसला गालात

लाजून झाला पाणी पाणी

होऊन अत्तर मनात शिरला

सुगंधित केली रात्र दिवाणी

 

झेंडू फुलला मळ्यात

गुंफला गेला हारात

सोन पिवळ्या रंगाची

मंचकी केली बरसात

 

अबोल झाली अबोली

थोडीच गंधित जरी झाली

कोमेजली नाही लवकरी

राहिली मनोहर रंग बावरी….

 

मोगऱ्याचा केला गजरा

माळला सख्याने मनगटी

रात्र अजूनच धुंद झाली

विझल्या दिव्याच्या वाती….

 

लालेलाल झाली लिली

पहिल्या पावसाने फुलली

रात्रभर हसत राहिली

लगेचच नाही ती सुकली..

 

रात्री धुंद फुंद मोहरली

आल्हादित निशाचर झाली

प्रेम वेडा सखा लाभताच

रातराणी ही शृंगारिक झाली ..

 

विलास कुलकर्णी

मीरा रोड

7506848664

प्रतिक्रिया व्यक्त करा