*शाळा तिथे दाखले या उपक्रमाची वामनराव महाडिक विद्यालयातून सुरुवात*
*कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचा स्तुत्य उपक्रम*
तळेरे
वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,तळेरे येथील सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळा तिथे दाखले या उपक्रमांतर्गत शैक्षणिक क्षेत्रात उपयोगी असणारे विविध प्रकारचे दाखले यावेळी वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी कणकवली तालुका तहसीलदार दीक्षांत देशपांडे,तळेरे मंडळ अधिकारी नागावकर,तळेरे तलाठी प्रमोद कोळपकर,तळेरे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव, औदुंबरनगर पोलीस पाटील श्रेया जंगले,कोतवाल तांबे,कणकवली तहसील सेतू कार्यालयातील कर्मचारी,तळेरे उपसरपंच रिया चव्हाण,माजी उपसरपंच शैलेश सुर्वे,शाळा समिती सदस्य प्रवीण वरूणकर,संतोष जठार,निलेश सोरप,प्राचार्य अविनाश मांजरेकर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद,दाखला पात्र असणारे विद्यार्थी,पालक,माजी विद्यार्थी उपस्थित होते.
शाळा तिथे दाखले या उपक्रमांतर्गत तालुक्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन अशा पद्धतीने दाखला वितरण मोहीम आम्ही राबवणार आहोत,शैक्षणिक वर्ष चालू होताना विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी धावपळ होऊ नये यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत,याची सुरुवात या प्रशालेतुन करत आहोत,असे प्रतिपादन कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले.
दरवर्षी चालू होणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी मुलांना विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता भासते. आयत्यावेळी अनेक कागदपत्रे जमवणे आणि तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ते सगळे कामकाज पूर्ण करणे शक्य होत नाही.पालकांचा तो संपूर्ण त्रास वाचावा यासाठी तहसील कार्यालय कणकवली व विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे शैक्षणिक दाखले एकाच ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना कमी त्रासात सर्व शैक्षणिक दाखल्यांची पूर्तता होणार आहे असे प्रतिपादन प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी केले.
60 विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला,यामध्ये उत्पन्नाचा दाखला,नॉन क्रेमिलियर दाखला,डोंगरी दाखला,वय अधिवास दाखला, राष्ट्रीयत्व दाखला,जात दाखला, रहिवासी दाखला या प्रकारच्या दाखल्यांचा समावेश होता. प्रातिनिधिक स्वरूपात यापैकी काही दाखल्यांचे वितरण या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक सचिन शेटये यांनी केले.