सांगेली येथे १३ एप्रिल रोजी हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी शिबीर*
सावंतवाडी
ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग या रक्तदान, देहदान, अवयवदान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शासनमान्य नोंदणीकृत संस्थेमार्फत रक्तदान शिबिरे, रक्तगट तपासणी शिबिरे, हिमोग्लोबिन तपासणी शिबिरे, शाळा, कॉलेजीस, बचत गट ग्रामसंघ तसेच गावातील विविध सेवाभावी मंडळे आणि संस्था यांच्यासाठी रक्तदान विषयक जाणीव-जागृती कार्यशाळा इत्यादीचे आयोजन करतात.
याच कार्याचा एक भाग म्हणून येत्या रविवारी दि. १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत सांगेली गावात “गिरीजानाथ ग्रामसंघ, सांगेली” आणि “युवा विकास प्रतिष्ठान, सांगेली” यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्यमान आरोग्य मंदिर, सांगेली येथे हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी परिसरातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.