श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर, कुणकेश्वर येथे 3 दिवसीय निःशुल्क कोकण ध्यान शिबिराचे आयोजन
कुणकेश्वर
ध्यान, ज्ञान, फाउंडेशन आणि ब्रम्हानंद स्वामी ध्यान केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने
कोकण ध्यान शिबिराचे आयोजन दिनांक १०,११ व १२ एप्रिल २०२५ करण्यात आले आहे.
श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर, कुणकेश्वर येथे दि. १० एप्रिल रोजी सका.८.३० ते १० उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा.श्री. अरविंद सिताराम वाळके
आंबा बागायतदार व उद्योजक, मा. श्री. तुकाराम सहदेव तेली सामाजिक कार्यकर्ता, मा.श्री.अजय सुधाकर नानेरकर आंबा बागायतदार व उद्योजक व डॉ. रामदास विश्वनाथ बोरकर उपस्थित होते.
श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर ग्रामपंचायत, कुणकेश्वर, सर्व पदाधिकारीही उपस्थित होते.
स्वयंभू श्री क्षेत्र कुणकेश्वर, यांच्या आशीर्वादाने आणि महाअवतार बाबाजी, भगवान परशुराम, ब्रह्मर्षि पितामह पत्रीजींच्या दिव्य प्रेरणेने दक्षिण कोकणचे काशी क्षेत्र कुणकेश्वर मंदिराच्या प्रांगणात प्रथमच निशुल्क कोकण ध्यान शिबीर
(तीन दिवसीय निवासी ध्यान शिबिर)
10 ते 12 एप्रिल 2025 आयोजन केले आहे.
या ध्यान शिबिरासाठी ब्रह्मर्षि शशिकांत जोशी, सुप्रिया आष्टीकर, मनाली राणे, विनिता धुरी, ब्रह्मर्षि श्रीकांत कुलकर्णी, शिल्पा प्रधान, सविता शिंदे, डॉ. अमृता जोशी, सीनियर पिरॅमिड मास्टर अवनी राव, रमेश शिंदे, प्रीतम कल्याणकर, वेणू पामू, गोपाळ तारी, डॉ. अर्जुन कुंभार, सुप्रिया दाते प्रमुख उपस्थित असणार आहेत.
• रामभक्त चिरंजीवी हनुमानजी यांच्या जयंती आणि पौर्णिमेच्या दिव्य उर्जेत, स्वयंभू महादेव यांच्या सानिध्यात, समुद्राच्या सानिध्यात (जलतत्त्व). पिरॅमिड ध्यानाचा अद्वितीय अनुभव.
•
विविध जीवनावश्यक विषयांवर मास्टर्स द्वारे आत्मज्ञान सत्रे.
• ऊर्जामय भोजन प्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम. • मानसिक शांतीसाठी आणि आनंदपूर्वक जीवन जगण्यासाठी सोपे पिरॅमिड ध्यान शिबिर असे कार्यक्रम असे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजक श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर ग्रामस्थ, ग्रामपंचायत कुणकेश्वर आहेत.
ध्यान कोणी करावं, कशासाठी करावं, किती वेळ करावं, कुठे करावं आणि करण्याची शास्त्रोक्त पद्धत यासंबंधीची संपूर्ण माहिती या शिबिरात देण्यात येईल. सदर प्रशिक्षण देण्यासाठी उपरोक्त संस्थेच्या महाराष्ट्र राज्यातील अनेक ठिकाणाहून ध्यान धारणेतील अधिकारी व्यक्ती येथे येणार आहेत…
ध्यानामुळे मिळणारे शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक फायदे, ध्यान करताना शरीरात घडणारे बदल आणि त्यांचं वैद्यकीय शास्त्राप्रमाणे विवेचन, मानवी शरीरातील सात चक्रे व त्यांची कार्य, पतंजली योग सूत्राची माहिती, कर्म सिद्धांताची सोपी मांडणी, आणि पिरॅमिड शक्तीची शास्त्रीय माहिती ह्या प्रशिक्षण शिबिरात देण्यात येईल…
ध्यानामुळे विद्यार्थ्यांना मिळणारे फायदे… एकाग्रता आत्मविश्वासात वाढ आणि स्मरणशक्तीतील वाढ ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य संपन्न आणि मैत्रीपूर्ण निरामय जीवन जगण्याची अंतरीत शक्ती
आणि समाजातील इतर सर्व घटकांसाठी म्हणजेच नोकरदार उद्योजक व्यापारी शिक्षण बागायतदार डॉक्टर इंजिनियर्स वकील पोलीस कर्मचारी वगैरे सर्वांसाठी नायरास्य मुक्त आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठीची सोपी पद्धत आत्मसात करण्यासाठी सदर शिबिराचा लाभ सर्व नागरिकांनी जरूर घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.
सदर शिबीर निवासी असून विनाशुल्क आहे. बाहेरून येणार्या शिबिरार्थीची निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली असून, स्थानिक शिबिरार्थी निवासासाठी घरी परतू शकतात. सर्वांनाच चहा नाष्टा व भोजनाची सोय विनाशुल्क करण्यात आली आहे.
उर्जेचा प्रचंड स्त्रोत असणार्या कुणकेश्वर मंदिर येथे होऊ घातलेल्या या शिबिरासाठी जाहीर निमंत्रण देतानाच, आपल्या परिसरातील नागरिकाना हे प्रशिक्षण शिबीर आत्मिक व भौतिक उन्नत्तीसाठी सुवर्णसंधी ठरणार असून, त्याचा सर्वांनी जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने पुन्हा एकदा करण्यात येत आहे.