माकड आडवा आल्याने अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी*
सावंतवाडी
माकड आडवा आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कुडाळ-गोवेरी येथील युवक जखमी झाला. हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ला-बेळगाव महामार्गावर बुरडीपुल येथे घडला. प्रशांत गावडे (वय ४२) असे त्याचे नाव आहे. त्यांना प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत गावडे हे आपल्या ताब्यातील दुचाकी वरून गोवेरी येथे जात होते. दरम्यान गाडी समोर अचानक माकड आडवा आल्याने त्यांनी ब्रेक लावला. यात त्यांचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात घडला. या अपघातात त्यांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान त्यांना प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.