You are currently viewing वैश्यवाड्यात हनुमान जन्मोत्सवानिमित्त समई नृत्य व विविध कार्यक्रम

वैश्यवाड्यात हनुमान जन्मोत्सवानिमित्त समई नृत्य व विविध कार्यक्रम

वैश्यवाड्यात हनुमान जन्मोत्सवानिमित्त समई नृत्य व विविध कार्यक्रम

सावंतवाडी:

वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शुक्रवार दि. ११ एप्रिल पासून सोमवार दि. १३ एप्रिलपर्यंत विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता पाककला स्पर्धा
त्यानंतर ६.३० वाजता कपिल कांबळी यांचा कार्यक्रम व होम मिनिस्टर स्पर्धा तर दिनांक १२ रोजी हनुमान जन्मोत्सवा दिवशी सकाळी ८ वाजता ह. भ. प. सौ. ललिन तेली यांचे श्री हनुमान जन्मावर आधारित सुश्राव्य कीर्तन, हनुमान जन्मोत्सव, दुपारी ३ वाजता श्री सत्य नारायण महापुजा, महाआरती, भजन व त्यानंतर देवगड नाद भोळेवाडी येथील ब्राह्मण देव महिला मंडळाचे समई नृत्य तसेच त्यानंतर वैश्यवाड्यातील कलाकारांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा