कै. सुरेश सुद्रीक स्मृती चषक स्पर्धेत कणकवली संघ विजेता.
कणकवली
कै. सुरेश सुद्रीक चारिटेबल ट्रस्ट व नवयुवक तरुण मित्रमंडळ कळसुली यांच्या संयुक्त विद्यमानाने कळसुली हुंबरणे पुनर्वसन येथील मैदानावर आयोजित प्रकाशझोतातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत फक्त आम्ही मित्रमंडळ कणकवली संघाने दिंडवणे अ संघावर मत करत विजेते पद पटकावले. विजेता व उपविजेता संघाला मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कल्पेश सुद्रीक, संतोष मुरकर, भरत घाडीगावकर, रुजय फर्नांडिस, रविंद्र घोगळे, सागर शिर्के, दिलीप काणेकर, अमरेश सातोसे, सुधीर हळवे, श्रीकृष्ण घाडीगावकर, लिलाधार लाड, संदीप शिरोडकर आदि उपस्थित होते. हि स्पर्धा ग्रा.पं.सदस्य कल्पेश सुद्रीक यांच्या संकल्पनेतून गेली १२ वर्षे भरविण्यात येत आहे.
स्पर्धेत २० संघ सहभागी होते. अंतिम सामन्यात दिंडवणे अ संघाने २ षटकात २० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल फक्त आम्ही मित्रमंडळ कणकवली संघाने यशस्वीरीत्या धावाचा पाठलाग केला. या स्पर्धेत मालिकावीर धनंजय धुखंडे (फक्त आम्ही मित्रमंडळ कणकवली), उत्कृष्ट फलंदाज सूरज घाडीगावकर (दिंडवणे अ), उत्कृष्ट गोलंदाज चेतन फोंडेकर (फक्त आम्ही मित्रमंडळ कणकवली) व क्षेत्ररक्षक बाळा डिचोलकर (फक्त आम्ही मित्रमंडळ कणकवली) यांनाही गौरविण्यात आले. तत्पूर्वी उपांत्य फेरीत मांग्येश्वर भडगाव व प्रसन्ना इलेवन या दिन्हीही पराभूत संघांनी बहारदार खेळ करून रसिकांची माने जिंकली.
स्पर्धेत पंच म्हणून सुश्रुत वारंग, वैभव मुरकर, श्रेयश मुरकर. गुणलेखण वैभव चव्हाण व सचिन राणे. समालोचन डेविड फर्नांडिस, सचिन घाडीगावकर व विठ्ठल चव्हाण यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीरीत्येसाठी सम्राट शिर्के, मिथिलेश शिरोडकर, अक्षय मुरकर, चिन्मय घोगळे, मृण्मय वारंग, रमेश सुद्रीक, प्रथमेश परब, आनंद राणे, गणेश चव्हाण, यश लाड, संजय तेली, संजय गोसावी, हर्ष भोगले, अमित मुरकर, सुयोग वारंग, उत्कर्ष तेली, बाळकृष्ण पडते, अनिकेत वारंग, विशाल लाड, अनिल भोगले, प्रसाद भोगले.