भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
समता सप्ताहानिमित्त स्वाधार योजनेच्या पात्र विद्यार्थ्यांना धनादेश व माहिती पुस्तीकेचे वाटप
सिंधुदुर्गनगरी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 8 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या पात्र विद्यार्थ्यांना धनादेश व माहिती पुस्तीकेचे वाटप समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांच्या हस्ते करण्यात आले.
समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वसतिगृहे, जिल्ह्यातील महाविद्यालये, शाळा येथे भारतीय संविधानाची उद्देशिका, प्रस्ताविकांचे वाचन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत वकृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शासकीय वसतिगृहे, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी/ विद्यार्थींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होतो.