You are currently viewing जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम

जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम

जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम

सिंधुदुर्गनगरी 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून “समता पंधरवडा” साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत दि. 1 ते 14 एप्रिल या कालावधीत जात प्रमाणपत्र जडताळणीबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेध्ये इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान या इयत्तेमध्ये शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सचिन साळे यांनी केले आहे.

             सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे / उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येते. दरवर्षी विद्यार्थ्यांनी  12 वी मध्ये शिकत असताना 30 नोव्हेंबर पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता अर्ज सादर करणे आवश्यक असते. समता पंधरवडया निमित्त दि.01 एप्रिल 2025 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात येत आहे. या विशेष मोहिमे अंतर्गत प्रत्यक्ष काही महाविद्यालयात जाऊन शिबीराचे (कॅम्पचे) नियोजन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावेत. या उद्देशाने हा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांनी हाती घेतला आहे.

12 वी विज्ञान उत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी वैद्यकियअभियांत्रिकीआर्कीटेक्चर, फार्मसी, कृषी, L.L.BB.F.A, हॉटेल व्यवस्थापन अशा शाखेच्या उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. यासाठी त्यांना सी.इ.टी / निट / जे.इ.इ / नाटा अशा प्रवेश परिक्षा द्याव्या लागतात. या प्रवेश प्रक्रियेसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहेविद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवेशापूर्वी त्यांच्या जात पडताळणी अर्जावर निर्णय घेऊन जात वैधता प्रमाणपत्र देणे ही प्रक्रिया करण्यासाठी समितीला निर्णय घेण्यासाठी लागणारा कालावधी 3+2=5 (पाच) महिन्याचा आहे.

त्यामुळे महाराष्ट्र शासन निर्णयानुसार प्रत्येक वर्षी 30 नोव्हेंबर पर्यंत समितीकडे अर्ज सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. समता पंधरवड्या मध्ये 11 वी व 12 वी विज्ञान अभ्यासक्रमात शिक्षण घेणारे विद्यार्थीच जात प्रमाणपत्र पडताळणी करीता अर्ज सादर करु शकतात. तरी विद्यार्थ्यांनी https://ccvis.barti.in  या संकेतस्थळावर CCVIS येथे ऑनलाईन अर्ज भरावेत. अर्जाची प्रिंट, मुळ कागदपत्रे व त्यांची साक्षांकित प्रत इ.कागदपत्रे जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता विद्यार्थी किंवा त्यांचे पालक यांनी समिती कार्यालयात सादर करावी. असे आवाहन. अध्यक्ष श्रीम समिक्षा चंद्राकर, उपायुक्त तथा सदस्य उमेश घुले,  संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव,  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीव्दारे करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा