*राणे साहेबांचा परीसस्पर्श -*
आज राणे साहेबांचा वाढदिवस आणि उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी भव्य *मार्केट यार्ड* चे होणारे भूमिपूजन अशी वाढदिवसाची अतुल्य भेट या जिल्ह्याला मिळते आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल जनतेतून कौतुक होत आहे, त्यासोबतच याचे शिल्पकार पालकमंत्री नितेश राणे यांनी वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्याला दिलेली ही भेटच म्हणू! भारतीय जनता पार्टी च्या सरकारने कोकणातील शेतकऱ्यांना दिलेली खंबीर साथ !
*कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंधुदुर्ग* यांच्या माध्यमातून साकार होत असलेल्या मार्केट यार्ड चे भूमीपुजन होत असलेल्या ‘नांदगाव’ येथील जागेवर भेट दिली असता , *६५ वर्षे* वय असलेल्या पण जिद्दीने *तरुण* असलेल्या सभापती श्री तुळशीदास रावराणे आणि त्यांच्या टीम ची भेट झाली त्यातून काही बाबी लक्षात आल्या त्या जनतेसमोर आणंण गरजेचे वाटते.
राणे साहेब यांनी या कृषी उत्पन्न बाजार समिती ची निवडणूक संस्थेचा खर्च टाळण्यासाठी बिनविरोध केली कारण मुळातच संस्थेकडे फक्त १२०००/- होते आणि कामगारांचे पगारही देणं समोर होते. अशा परिस्थितीत या संस्थेला श्री तुळशीदास रावराणे यांची सभापती नेमणूक करीत राणे साहेब यांचा संस्थेला परीसस्पर्श झाला. बिकट परिस्थितीत असताना देखील संस्थेची जागा शोधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. राणे साहेबांचे एकच स्वप्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काचे मार्केट यार्ड उपलब्ध व्हावे, शेतमालाला विक्रीसाठी हक्काची जागा असावी मुंबईच्या एपीएमसी भरतीवर जिल्ह्यातील मार्केट यार्ड असावे . आंबा काजू भातपिक, मासे ही इथली प्रमुख उत्पादने त्याला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी असलेली यंत्रणा उभी करणे हे मोठं काम उभं करायचं होतं. जागा मिळाली, अगदी नांदगाव रेल्वे स्टेशन जवळच ५०० मीटर, मुंबई गोवा हायवे पासून चार किलोमीटरवर तर निपाणी देवगड हायवे पासून 200 मीटर वर. जागा अकृषिक असल्यामुळे परत परवानगी रद्द करत प्लॉटचे एकत्रीकरण करणे अशा अनेक समस्या होत्या. राणे साहेबांचे स्वप्न आणि 65 वर्षाच्या तरुणांने याचा पाठपुरावा करत , पालकमंत्री नितेश राणे यांच्या अथक प्रयत्नाने सर्व परवानगी सहा महिन्यात पार केल्या. त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंत्रालय स्तरावर पाठपुरवठा करत भव्य अशा मार्केट यार्ड ची संकल्पना सत्यात उतरण्याचे काम सुरू झाले. अंदाजे 70 कोटी खर्च करून भव्य दिव्य असे मार्केट यार्ड उभे राहत आहे. यामध्ये अगदी बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी निवासी व्यवस्थापन असेल, फळांसाठी रायपनिंग चेंबर, कोल्ड स्टोरेज, काजू साठी ग्रेडिंग केंद्र, स्टोरेज अशा सर्व सोयीसुविधा चा विचार येथे करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात साडेपाच कोटी उपलब्ध झालेत भविष्यात हा प्रकल्प पूर्ण होण्याचा निधी पालकमंत्री नक्कीच घेऊन येतील सोबतच रेल्वे मार्गही जवळ असल्याने रोरो सेवेने तो मोठ्या शहरांची जोडला जाईल अशी अद्यावत एपीएमसी या महाराष्ट्राला लाभली ! कोकणाने भाजपाला दिलेली साथ आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातील भाजपाचे सरकार यामुळे कोकणवासीयांचे स्वप्न आणि राणे साहेबांची प्रदीर्घ काळाची इच्छा सत्यात उतरत आहे.
सर्वच कार्यकर्ते आज खासदार साहेबांना बुके देतील परंतु त्याची परतफेड म्हणून पालकमंत्री साहेबांची टीम या जिल्ह्याला मार्केट यार्ड रुपी ATM देत आहे जे स्थानिकांना कायम साथ देईल. १२०००/- च्या बॅक जमा रक्कम असतानाही मोठं स्वप्न पाहणारी संस्थाचालक आणि कोकणचे नेते यांना सलाम!
यानिमित्ताने अटलजींच्या पंक्तीची आठवण झाली –
हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा
काल के कपाल पर लिखता मिटाता हूं
गीत नया गाता हूं।
साहेब दिर्घायुष्यी व्हा !
*श्रीकृष्ण परब*
जिल्हा संयोजक
भाजपा सोशल मीडिया
सिंधुदुर्ग