*सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा संपन्न*
ओरोस
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि सिंधुदुर्गचे निरिक्षक शशांक बावचकर यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शिक्षक पतसंस्था सभागृहात आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हल्लीच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता. राज्याच्या दौऱ्याची सुरवात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याची पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसला बळ देण्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निरिक्षक म्हणून नियुक्ती करून जिल्हा काँग्रेसचा तालुकावार आढावा घेण्याच्या सुचना प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्या होत्या आणि त्यासाठी जिल्हा काँग्रेसची सभा ओरोस येथे आयोजित करण्यात आली होती.
सदर सभेत शशांक बावचकर यांनी पक्ष संघटनेचा सविस्तर आढावा घेतला. कार्यकर्त्यांना संबोधित करताना शशांक बावचकर म्हणाले,आज जरी काँग्रेस पक्ष अडचणीत असला तरी काँग्रेस ही फक्त एक संघटना नसून तो एक समाजातील सर्व घटकाना एकत्र घेऊन जाणारा विचार आहे आणि विचार कधी संपत नाही. निवडणूका येतात जातात हार जीत होत असते परंतू आपण काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी त्यांचा आवाज बनून त्यांची पिळवणूक करणाऱ्या सरकारच्या धोरणांविरोधात संघर्ष करायला पाहिजे.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, दिलीप नार्वेकर, प्रकाश जैतापकर,सुगंधा साटम, उपाध्यक्ष विलास गावडे, नागेश मोर्ये,सरचिटणीस अरविंद मोंडकर, प्रवीण वरूनकर, विनायक मेस्त्री,चंद्रशेखर जोशी, केतनकुमार गावडे,कृष्णा धाऊसकर, प्रदिप मांजरेकर, महेंद्र सांगेलकर, विधाता सावंत, वासुदेव नाईक, जेम्स फर्नांडिस, संदेश कोयंडे, श्रीकृष्ण तळवडेकर, बाळासाहेब नंद्दीहळ्ळी, अमिदी मेस्त्री,महेंद्र मांजरेकर, प्रथमेश परब, महेश परब, विजय सावंत, अन्वर खान, शिवा गावडे, विद्याप्रसाद बांदेकर, तौकिर शेख, समीर वंजारी, अभय मालवणकर, संजय लाड,आनंद नाईक, आशिष काष्टे, प्रवीण मोरे, तबरेज शेख, भालचंद्र जाधव इत्यादी उपस्थित होते.