आय ए एस अकादमी अमरावती द्वारा राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्काराची घोषणा
—————–
प्रा गजानन
भारसाकळे पहिल्या पुरस्काराचे मानकरी
——————
अमरावती: शैक्षणिक तथा सामाजिक कार्य, पर्यावरण तथा गो सेवा या सर्व क्षेत्रात आपल्या अभिनव तथा संशोधन कार्याने संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित असलेले दर्यापूरच्या गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष प्रा गजानन भारसाकळे यांना पहिला राज्यस्तरीय डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार घोषीत झाला आहे . अमरावती येथील सर्व देशभर सुपरिचित असलेल्या आय एस मिशन द्वारा यावर्षी पासून राज्य स्तरीय डॉ भाऊसाहेब देशमुख कृषी रत्न पुरस्कार देण्यात येत आहे .या अनुषंगाने आज या पुरस्काराची आय ए एस मिशनचे संचालक डॉ नरेशचंद्र काठोळे यांनी शिक्षणमहर्षि तथा कृषी रत्न डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 10 एप्रिल या स्मृती दिनाच्या पूर्व संधेला ही घोषणा केली .अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या बाभूळगांव -अकोला येथे सिव्हील इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा गजानन रामकृष्ण भारसाकळे यांना त्यांच्या अष्टपैलू कार्यासाठी विविध सामाजिक व शैक्षणीक संघटना तसेच विद्यापीठ व शासकीय पुरस्कारांनी वेळो वेळी सन्मानित करण्यात आलेले आहे .कृषी क्षेत्राशी अंत्यत निगडीत असलेल्या गो सेवा व त्याद्वारे विविध संशोधनपर कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आहे . प्रा भारसाकळे यांनी गाईच्या शेणाची गोवरी एक उर्जास्त्रोत , शेण व पालापाचोळा तथा जनावरांच्या गोठ्यातील वाया गेलोला चारा यापासून विशिष्ट प्रकारच्या कॉम्पोस्ट खताची निर्मिती केलेली आहे . तसेच लम्पी या जनावरांच्या आजारावर त्यांनी ओली हळद यापासून यशस्वी औषधी निर्मिती सुद्धा तयार केलेली आहे . या सर्व विषयांवर त्यांचे मुंबई येथील केंद्रशासनाच्या कार्यालयात पेंटेंट मिळण्यास्तव अर्ज सादर आहेत . यावर आधारीत विषयांवर त्यांचे आजवर तीन आंतरराष्ट्रीय जनरल मध्ये पेपर सुद्धा प्रसिद्ध झालेले आहे .मिशन आय ए एस अमरावती यांच्या आज घोषीत या राज्यस्तरीय पहिल्या पुरस्काराने त्यांच्या आजवर प्राप्त पुरस्कारात भर पडली आहे .येत्या 1मे या महाराष्ट्र दिनी वितरीत केल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबाबत त्यांचे स्व दादासाहेब काळमेघ प्रतिष्ठान अमरावती, अमरावती जिल्हा भारत कृषक समाज , गाडगेबाबा मंडळ दर्यापूर, डॉ पंजाबराव देशमुख विचारमंच दर्यापूर , गाडगेबाबा गोरक्षण संस्था माहुली ( धांडे ) , माजी विद्यार्थी संघटना अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय अकोला , गार्डन क्लब दर्यापूर तथा ग्रामपंचायत बेलोरा यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे .
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक
डॉ. पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमी अमरावती.