You are currently viewing स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ तर्फ पथनाट्य, व्याख्यान आणि हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ तर्फ पथनाट्य, व्याख्यान आणि हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ तर्फ पथनाट्य, व्याख्यान आणि हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा

प्राधिकरण, निगडी-

दिनांक ८ एप्रिल रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभागातर्फे पथनाट्य, व्याख्यान व चैत्रगौर हळदी कुंकू असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर चैत्रगौरीचे पुजन प्रमुख वक्त्या सौ . कल्पनाताई क्षीरसागर, पथनाट्याच्या प्रमुख सौ. ज्योतीताई कानेटकर, महिला विभागाच्या कार्याध्यक्षा सौ. अश्विनी अनंतपुरे, सहकार्याध्यक्षा सौ. वैदेही पटवर्धन व अध्यक्षा सौ. अनघा कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर “कुटुंब प्रबोधन “या विषयावर ज्योतीताई कानेटकर व त्यांच्या सहकारी मैत्रिणींनी अत्यंत सुंदर रित्या पथनाट्य सादर केलं.
कुटुंब म्हणजे शक्ती, ताकद हे विचार त्यांनी मांडले. छोट्या छोट्या नाटुकलीतून त्यांनी लोप पावत चाललेली कुटुंब पद्धती तसेच बदलणारे विचार यावर प्रकाश टाकला. कुटुंब संवर्धन करणे ही काळाची गरज आहे असे विचार मांडले. त्यानंतर ज्योती ताईंचा व सहकाऱ्यांचा सत्कार महिला विभागाच्या अध्यक्षा सौ. अनघा कानडे यांनी केला.
प्रमुख वक्त्या सौ. कल्पनाताई क्षीरसागर यांचा परिचय सौ. वीणा महाजन यांनी करून दिला. कल्पनाताईंचा सत्कार सौ अश्विनी अनंतपुरे ,सौ वैदेही पटवर्धन व सौ अनघा कानडे यांनी केला. कल्पनाताईंनी “स्वयंपाकघर एकऊर्जास्रोत या विषयावर आपले विचार शांत, गोड अशा आपल्या मधुरवाणीने मांडले. स्वयंपाकघरात अन्नपूर्णेचा वास असतो, सर्व कामाचा स्रोत हे स्वयंपाकघरच असते. तिथे नेहमी आपण नतमस्तकच व्हावं कारण पोट आहे तरच संरक्षणाचा कोट आहे असे विचार त्यांनी मांडले. स्वयंपाक म्हणजे स्वतः केलेली पाकसिद्धी . स्वयंपाक करताना नेहमी अग्नीसंस्कार करून , पुजा करून श्लोक म्हणत स्वयंपाक करावा म्हणजे पदार्थात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन ती ऊर्जा घरातील व्यक्तींना अन्नातून मिळते. जसं देह देवाचे मंदिर तसेच अन्नपूर्णेचे वसतीस्थान म्हणजे स्वयंपाकघर असे पवित्र विचार त्यांनी मांडून सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
त्यानंतर कार्यक्रमाची सांगता सर्व महिलांना हळदीकुंकू देऊन कैरीची डाळ, पन्ह, भिजवलेले हरभरे देऊन करण्यात आली.
या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला विभागाच्या कोषाध्यक्षा सौ. संपदा पटवर्धन यांनी केले तर प्रास्ताविक सौ. हर्षदा पोरे यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी निवेदन व आभार सौ. राधिका सुखटणकर यांनी केले.
असा हा महिलांना हवाहवासा वाटणारा चैत्रगौरीच्या हळदीकुंकूवाचा कार्यक्रम दोन उत्कृष्ट विषय घेऊन अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमावेळी जवळजवळ १०० महिला उपस्थित होत्या.

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
9890568468

प्रतिक्रिया व्यक्त करा