*डॉ. हॅनिमन जयंती आणि होमिओपॅथीचा प्रसार*
दिनांक 10 एप्रिल 1755 रोजी जर्मनीत जन्मलेल्या होमिओपॅथीचे जनक डॉक्टर हॅनिमान यांचा 270 वा जन्मदिन भारतात साजरा होत आहेत. होमिओपॅथी ची महाविद्यालये भारतात व महाराष्ट्रा मध्ये मोठ्या प्रमाणात शासनाने सुरू केलेली आहे. ही सर्व महाविद्यालये खाजगी आहेत. महाराष्ट्रात फक्त एक शासकीय काॅलेज जळगाव येथे सुरू झाले आहे. होमिओपॅथी महाविद्यालयात शिक्षण घेऊन तयार होणारी डॉक्टर्स महाराष्ट्रामध्ये शहरी व ग्रामीण भागात कार्यरत असतात. त्यापैकी बरीच डॉक्टर मंडळी ही नाईलाजास्त ऍलोपॅथिक प्रॅक्टिस करतात. जे डॉक्टर होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतात त्यांना त्यांच्या प्रचार प्रसार मध्ये बऱ्याच अडचणी निर्माण येतात. विशेषतः सर्वात मोठी अडचण म्हणजे होमिओपॅथिक फार्मसी (मेडिकल स्टोअर) यांची वानवा मोठ्या प्रमाणात आढळते. पूर्वी नागपूर सारख्या मोठया शहरांमध्ये तीन ते चार होमिओपॅथिक फार्मसी (मेडिकल स्टोअर) उपलब्ध होती. आता ही संख्या थोडीफार वाढली आहेत तथापि होमिओपॅथिक डॉक्टरांच्या संख्येच्या तुलनेमध्ये आणि होमिओपॅथीचा प्रचार व प्रसार करण्यामध्ये या फार्मसीची संख्या अत्यंत नगण्य आहे. होमिओपॅथिक औषधी सहज उपलब्ध न होणे हे होमिओपॅथीच्या प्रसारामधला सर्वात मोठा अडथळा आहे. मागील दोन वर्षांपूर्वी कोरोना काळामध्ये होमिओपॅथिक औषध घेतल्याने कोरोना होत नाही किंवा कोरोना आजाराला प्रिव्हेन्शन म्हणून होमिओपॅथीचे औषध उपयोगी ठरतात अशा प्रकारचा प्रचार दूरदर्शन चया माधयमाने मोठ्या प्रमाणात झाला होता. परंतु त्यावेळी ही औषधे कुठे उपलब्ध आहे याची माहिती प्रसार माध्यमांनी दिली नव्हती किंवा सामान्य माणसांना ही माहीती नव्हती. ज्यावेळी होमिओपॅथीचे आर्सेनिक अल्बम नावाचे औषध रोगप्रतिबंधात्मक म्हणून होमिओपॅथिक डॉक्टरांनी आणि सेवाभावी संस्थांनी मोफत वाटायला सुरुवात केली त्यावेळी सामान्य च्या तोंडातून हीच प्रतिक्रिया ऐकायला मिळाली की हे औषध कुठे मिळते याची आम्हाला कोणतीही कल्पना नाही. कारण मोठ्या शहरांमध्ये दोन ते तीन होमिओपॅथिक फार्मसी आढळतील. अजूनही लहान शहरांमध्ये त्याची माहिती सुद्धा नाही. तालुका स्तरावर वर तर कोणत्याच प्रकारचा त्याचा मागमूसही नाही. होमिओपॅथीची फार्मसी मोठ्या प्रमाणात न वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ही फार्मसी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले 20 सी हे लायसन्स अलीकडे फक्त ऍलोपॅथी मध्ये बी. फार्म झालेल्या विद्यार्थ्यांनाच उपलब्ध होते तसेच जे डॉक्टर्स होमिओपॅथी ची प्रॅक्टिस न करता होमिओपॅथिक फार्मसी चालवू इच्छिते अशांना होमिओपॅथिक फार्मसी चे लायसन मिळते. परंतु होमिओपॅथिक कॉलेजमध्ये पुर्वीच्या डी.एच.एम.एस किंवा आताच्या बी.एच.एम.एस. शिक्षण घेतल्यानंतर होमिओपॅथीची प्रॅक्टिस करण्याऐवजी होमिओपॅथीचे फार्मसी चालवावी असा विचार डॉक्टरांच्या मनात क्वचित येतो. त्यामुळे डॉक्टर लोकांनी होमिओपॅथिक औषधांची फार्मसी सुरू करण्यासाठी इच्छुक नसतात. त्यातही होमिओपॅथिक फार्मसी करण्यासाठी लागणारे भाग भांडवल हे सुद्धा मोठ्या प्रमाणात आवश्यक असते. ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ऍलोपॅथिक ब्रॅण्डेड फार्मसी टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाग भांडवल ची आवश्यकता होती परंतु त्यानंतर जेनेरिक फार्मसी ही कन्सेप्ट सामान्य लोकात रुजविल्यानंतर कमी पैशांमध्ये ऍलोपॅथिक जेनेरिक फार्मसी चे दुकान मोठ्या सुरू करण्यात आले. तशाप्रकारे होमिओपॅथी मध्ये जेनेरिक ही कन्सेप्ट सुरू न झाल्यामुळे होमिओपॅथिक फार्मसी सुरू करण्यासाठी खूप मोठे भांडवल लागते. त्यातही प्रत्येक औषधाचे वेगवेगळ्या पोटेन्सीचे डायल्युशन्स चा स्टॉक ठेवण्यासाठी मोठी जागाही लागते. ऍलोपॅथीची फार्मसी टाकण्यासाठी 120 स्क्वेअर फुटची जागा पुरेशी आहे परंतु होमिओपॅथी टाकण्यासाठी तेवढी जागा लायसन्स काढण्यासाठी पुरेशी असली तरी स्टॉक ठेवण्यासाठी तेवढी जागा पुरेशी ठरू शकत नाही. तसेच
सध्या होमिओपॅथी फार्मसी टाकण्यासाठी जे लायसन्स मिळवण्याची अट आहे ती फक्त बी. फार्म (एलोपॅथी) झालेल्या विद्यार्थ्यांनाच मिळते. त्यामुळे बी.फार्म झालेले विद्यार्थी हे सहसा फार्मसी, मेडिकल स्टोअर च्या क्षेत्रात उतरण्याऐवजी फार्मास्युटिकल व मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये नोकरी करण्याकडे यांचा कल असतो. त्यामुळे क्वचितच बी. फार्म झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःची होमिओपॅथी फार्मसी टाकलेली आहे. पूर्वी महाराष्ट्रामध्ये होमिओपॅथिक फार्मसी मध्ये काम केलेल्या सामान्य व्यक्तीला अनुभवाच्या आधारे होमिओपॅथी फार्मसी चे 20 सी हे लायसन्स उपलब्ध होत होते. परंतु अलीकडे यामध्ये बदल झाला असल्यामुळे हे लायसन्स अनुभवाच्या आधारे आता दिल्या जात नाही. भारत सरकारने अलीकडे जो एक कायदा तयार केलेला आहे त्या कायद्यामध्ये होमिओपॅथी मध्ये डी.फार्म, बी.फार्म केलेल्या विद्यार्थ्यांना होमिओपॅथी फार्मसी चे 20 सी लायसन्स देण्याची तरतूद केलेली आहे. परंतु अद्याप पर्यंत भारतामध्ये व महाराष्ट्रामध्ये होमिओपॅथी मध्ये डी. फार्म चा अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणात शासनाने सुरू केलेला नाही. त्यामुळे ही तरतूद कायद्यामध्ये आली असली तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. महाराष्ट्रातील एकाही होमिओपॅथिक कॉलेजमध्ये डी.फार्मसी, बी.फार्मसी हा स्वतंत्र अभ्यासक्रम शिकविल्या जात नाही. संपूर्ण भारतामध्ये फक्त दिल्लीमध्ये सिंम्पथी इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथिक फार्मसी व मध्यप्रदेश मधील काहीखाजगी विद्यापीठांनी
ही मागील काही वर्षापासून डी.फार्म (होमिओपॅथी), बी.फार्म (होमिओपॅथी) चे कोर्स चालवीत आहे. परंतु याचा लाभ फक्त कमी विद्यार्थीच घेतात. या सिम्पथी इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी फार्मसी ची एक राज्य शाखा महाराष्ट्र मध्ये अमरावतीला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अलीकडे डीफार्म (होमिओपॅथी) चे काही विद्यार्थी आता उपलब्ध झालेली आहे. त्यामधून उत्तीर्ण झालेल्या होमिओपॅथिक डी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांना लायसन्स मिळण्यास सुरुवात देखील झालेली आहे. परंतु डिप्लोमा इन होमिओपॅथिक, बॅचलर इन होमिओपॅथिक फार्मसी हा अभ्यासक्रम जोपर्यंत होमिओपॅथिक महाविद्यालया मधून चालविला जात नाही. तोपर्यंत होमिओपॅथिक डी.फार्म, बी.फार्म झालेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार नाही. त्यामुळे होमिओपॅथी फार्मसी ची दुकाने ही सध्या मोजक्याच संख्येमध्ये व मोठ्या शहरांमध्ये आहेत.
दुसरी बाब अशी की होमिओपॅथिक डॉक्टर्स रुग्णाला औषध देताना त्यांनी जे औषध रुग्णाला दिले त्याचे प्रिस्क्रीप्शन रुग्णाच्या हातांत दिल्या जात नाही. त्यामुळे रुग्णाला त्याने कोणते होमिओपॅथिक औषध घेतले किंवा कोणती औषध डॉक्टरांनी दिले याची माहिती नसल्यामुळे तो स्वतः होऊन होमिओपॅथीच्या फार्मसी मध्ये औषध खरेदी करण्यासाठी जात नाही. अलीकडे होमिओपॅथीच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये थोडा बदल झाल्याने मोठ्या प्रमाणात होमिओपॅथिक पेटंट औषधांची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे ठराविक आजारावरील औषधे, ठराविक पोटेन्सी मध्ये जी तयार झाली ती होमिओपॅथिक फार्मसी मध्ये उपलब्ध आहे. परंतु होमिओपॅथिक डॉक्टर पेशंटच्या हातामध्ये प्रिस्क्रीप्शन देत नसल्यामुळे या औषधाशिवाय इतर औषधी घेण्याची त्याची मानसिकता तयार झालेली नाही किंवा हिम्मत होत नाही. एलोपॅथीक प्रिस्क्रीप्शन रुग्णाच्या हातामध्ये पडल्यानंतर ही औषधे तो ऍलोपॅथिक फार्मसी मध्ये जाऊन नियमित घेत असतो अशा प्रकारे जर होमिओपॅथी मध्ये पद्धत सुरू झाली तर होमिओपॅथीचा प्रचार प्रसार होईल. परंतु यामध्ये डॉक्टर्समध्ये समज आहे की होमिओपॅथीची औषध ही कमीत कमी डोज व वेगवेगळ्या पोटेन्सी मध्ये घेणे आवश्यक असते. रुग्णाच्या हातात जर एक वेळा प्रिस्क्रीप्शन दिले तर तो रुग्ण होमिओपॅथिक डॉक्टर कडे न येता सेल्फ मेडिकेशन च्या तत्त्वाद्वारे स्वतःच त्याचे सेवन मोठ्या प्रमाणात करेल आणि त्याचे दुष्परिणाम रुग्णावर होतील अशी भीती असल्यामुळे होमिओपॅथिक डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन रुग्णाच्या हातात देण्याची पद्धत अजूनही महाराष्ट्रामध्ये आणि बहुतांशी इतरही राज्यामध्ये रुग्णांना दिल्या जात नाहीत. (काही राज्यांत ही प्रिस्क्रीप्शन दिल्या जातात अशी माहिती आहे.) होमिओपॅथिक डॉक्टर च्या मानसिकतेमध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत होमिओपॅथीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होणे शक्य नाही. महाराष्ट्रामध्ये अलीकडे महाराष्ट्र शासनाने मोठ्या शासकीय रुग्णालयामध्ये आयुष मंत्रालयाच्या मार्फत होमिओपॅथिक डॉक्टरांची नियुक्ती करणे सुरू केली आहे. परंतु या डॉक्टरांना त्या एलोपॅथीक दवाखान्यातल्या एखाद्या कोपऱ्यामध्ये बसवून त्या ठिकाणी होमिओपॅथीचे औषध सेवा उपलब्ध आहे ही माहिती बाहेर च्या रूग्णाला मिळण्यास विलंब होतो. तसेच या एलोपॅथीक दवाखान्यामध्ये होमिओपॅथिक औषधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मानसिकता ऍलोपॅथीच्या डॉक्टरांमध्ये नसल्यामुळे तो डॉक्टर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतो. त्याचप्रमाणे होमिओपॅथीची फक्त बेसिक औषध वापरावी असा दंडक घातला असलयाचे दिसून येते. होमिओपॅथिची पेटंट औषधे लिहून देऊ नये अशा प्रकारे सुद्धा दबाव बरीच वैद्यकीय अधीक्षक मंडळी होमिओपॅथिक डॉक्टरांवर आणतात अशा प्रकारची माहिती आहे. खरं म्हणजे ज्याप्रमाणे ऍलोपॅथिक डॉक्टर वेगवेगळ्या कंपनीचे पेटंट औषध लिहून देतो त्याप्रमाणेच होमिओपॅथिक प्रॅक्टिस करणाऱ्या आयुष डॉक्टर ला सुद्धा होमिओपॅथिक औषध चे प्रिस्क्रीप्शन लिहिण्यासाठी अधिकार आहेत परंतु ऍलोपॅथिक डॉक्टर गैरसमजा मुळे किंवा त्याच्या एकतंत्री नियंत्रणामुळे होमिओपॅथिक डॉक्टरांना अशाप्रकारे पेटंट औषधे लिहून देण्यासाठी सूट देत नाही अशी माहिती आहे. होमिओपॅथीचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करावयाचा असल्यास जोपर्यंत होमिओपॅथिक डी.फार्म/ बी.फार्म/एम.डी झालेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात तयार होत नाहीत तोपर्यंत ज्याप्रमाणे आयुर्वेदिक फार्मसी सुरू करण्यासाठी जी सोपी पद्धत आहेत तशाच प्रकारे होमिओपॅथिक फार्मसी टाकण्यासाठी शासनाने सोपी पद्धत ठेवावी. तसेच होमिओपॅथिक डॉक्टर्स जे प्रॅक्टिस करतात त्यांना होमिओपॅथीची औषधे विक्रीसाठी ठेवण्यासाठी अधिकृत परवानगी (लायसन्स) द्यावी. जेणेकरून प्रत्येक डॉक्टर्स स्वतःच्या नियंत्रणाखाली काही प्रमाणात औषधे विक्रीसाठी ठेवू शकेल. याचा फायदा रुग्णांना होमिओपॅथिक औषधे सहज उपलब्ध होण्यामध्ये होईल. असे झाल्यास होमिओपॅथीचा प्रसार व प्रचार महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल यासाठी संघटना स्तरावर तसेच शासकीय स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे
*डॉ. दीपक केदार, एम.डी.(होमिओ)* आशियाड काॅलनी, अमरावती
9860 778227