सहकार हे पवित्र क्षेत्र, राजकीय वस्त्रे बाजूला ठेवून काम करूया…
बाबुराव धुरी; सोसायट्यांच्या नवनिर्वाचित संचालकांचा मणेरी येथे सन्मान…
दोडामार्ग
सहकार हे पवित्र क्षेत्र आहे, म्हणून सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी आपली राजकीय वस्त्रे बाजूला ठेवून काम करूया, असे आवाहन ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी येथे आयोजित कार्यक्रमात केले. कुलजर व परमे विकास सहकारी सोसायटीवर सहकार प्रेमी लोकांची संचालक म्हणून निवड झाली आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी मणेरी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब, शिवसेना तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस, काँग्रेस तालुका प्रमुख वासुदेव गवस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तालुका प्रमुख विलास सावळ आदी उपस्थित होते.