You are currently viewing लोरे ल. पा. योजना अंतर्गत उजवा कालवा बंदिस्त नलिका वितरण प्रणाली (PDN) कालवा ‌संदर्भात ‌केलेले लाक्षणीक उपोषण तूर्तास स्थगित….

लोरे ल. पा. योजना अंतर्गत उजवा कालवा बंदिस्त नलिका वितरण प्रणाली (PDN) कालवा ‌संदर्भात ‌केलेले लाक्षणीक उपोषण तूर्तास स्थगित….

लोरे ल. पा. योजना अंतर्गत उजवा कालवा बंदिस्त नलिका वितरण प्रणाली (PDN) कालवा ‌संदर्भात ‌केलेले लाक्षणीक उपोषण तूर्तास स्थगित….

मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारणार – निलेश अशोक राणे व रमेश विश्राम राणे

कणकवली

लोरे ल. पा. योजना ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग अंतर्गत उजवा कालवा बंदिस्त नलिका वितरण प्रणाली (PDN) कालवा ‌संदर्भात श्री. निलेश अशोक राणे व श्री. रमेश विश्राम राणे यांनी लाक्षणीक उपोषणाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी सकाळीच उपोषण आंदोलनास प्रारंभ केला होता.

उपोषणकर्त्यांनी खालील मागण्या साठी उपोषण सुरू केले होते.

१) ह्या कालव्याच्या बांधणीसाठी २,४९,५३, ३९३ एवढी रक्कम खर्च होऊन पण लोरे व वाघेरी येथे सद्यस्थितीमध्ये पाणी येत नाही आहे.

२) ह्या कालव्याचे बांधकाम करतेवेळी तेथे असणारी झाडे तोडण्यात आली त्या झाडांचा मोबदला त्या जमीन धारकांना मिळावा.

३) सन २०२१,२०२२,२०२३,२०२४ आणि २०२५ ह्या साली तेथे पाणी आले नाही, म्हणून सलग ५ वर्ष शेतकरी तेथे शेती करू शकला नाही. ५ वर्ष शेती न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे ५ वर्ष झालेले शेतीसंबंधी (भुईमूग, सूर्यफूल, तिळी, चवळी, मूग, ऊस ) ह्या पिकांचे ५ वर्ष झालेले नुकसान तुम्ही भरून द्यावे..

४) ह्या सर्व कारणांसाठी दिनांक ०९/०४/२०२५ पासून लोरे नं. १ येथून पाईप लाईन गेली आहे त्याच्या मध्य भागावर फोंडा वैभववाडी महामार्गालगत तसेच मोना वहाळ नजीक लाक्षणीक उपोषणाचा मार्ग अवलंबत असल्याचे.
उपोषणकर्ते – श्री. निलेश अशोक राणे व श्री. रमेश विश्राम राणे. यांनी सांगितले होते.

आजच्या लाक्षणीक उपोषणाला सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आबडपाल येथील अधिका-यानी सा. 5.30 भेट दिली.

म्हहत्वाचा मुद्दा आमच्या शेताची नुकसान भरपाई देण्याची अशी कोणतीही तरतुद नाही
असे उपोषणकर्त्यांना सांगण्यात आले.
परंतु उपोषणकर्त्यांनी केलेल्या मागणीवरती ठाम‌ राहण्याचा निर्णय घेतला आहे.
येणाऱ्या काही दिवसात त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ‌ आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारणार असे त्यांनी सांगितले. तूर्तास आजचे उपोषण स्थगित करण्यात येत असल्याचे ‌उपोषणकर्ते
श्री. रमेश विश्राम राणे, श्री. निलेश अशोक राणे यांनी ‌ सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा