You are currently viewing अजंठा हॉटेलच्या मालकिन कै. सुहानी मारुती सुर्वे यांच्या स्मरणार्थ त्यांची नात दक्षता सुर्वे कडून हॉस्पिटलला रुग्णोपयोगी साहित्य भेट.

अजंठा हॉटेलच्या मालकिन कै. सुहानी मारुती सुर्वे यांच्या स्मरणार्थ त्यांची नात दक्षता सुर्वे कडून हॉस्पिटलला रुग्णोपयोगी साहित्य भेट.

अजंठा हॉटेलच्या मालकिन कै. सुहानी मारुती सुर्वे यांच्या स्मरणार्थ त्यांची नात दक्षता सुर्वे कडून हॉस्पिटलला रुग्णोपयोगी साहित्य भेट.

अधीक्षक डॉ.डी.ए ऐवळे यांनी दक्षता सुर्वे यांचे मानले आभार.

सावंतवाडी

दक्षता सुर्वे व श्रीईशा सुर्वे यांनी आपल्या आजीच्या स्मरणार्थ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांसाठी रुग्णोपयोगी साहित्य भेट दिल्या.
आजारी असताना आपली आजी याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती याची जाणीव ठेवून दक्षता सुर्वे यांनी हा सेवाभावी उपक्रम राबवला यासाठी त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला होता व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सदर साहित्य बादल्या, मग, व बेडशीट हॉस्पिटलला रुग्णांसाठी देण्यात आले त्यांच्या या उपक्रमाचे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून कौतुक करण्यात आले. याप्रसंगी डॉक्टर ऐवळे, दक्षता सुर्वे श्री ईशा सुर्वे, अमित मठकर, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम,सिस्टर स्टाफ मध्ये राणे, उबाळे, हेळेकर उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे की ज्यांच्या जवळ कुठच्याही प्रकारचे जुने किंवा नवीन रुग्णोपयोगी साहित्य पडून असतील तर त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानशी या नंबरवर संपर्क साधून रवी जाधव 9405264027/ रूपा मुद्राळे 9422633971 ते रुग्णोपयोगी साहित्य निराधार किंवा गरजू रुग्णांच्या उपयोगी आल्यास आपल्याला नक्कीच समाधान वाटेल याकरिता अशा रुग्णोपयोगी वस्तू आमच्या संस्थेकडे देण्याची कृपा करावी अशी विनंती रवी जाधव यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा