*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*“संत जगनाडे महाराज”*
संत जगनाडे विठ्ठलाचे निस्सीम भक्त
तुकोबांचे परम शिष्य शांतिदूत संत IIधृII
जन्मले पुणे मावळ सुंदूब्रे खेडे गावांत
धार्मिक संस्काराचे संसारी सद्गृहस्थ
व्यवसाय उत्तमपणे करणारे सद् भक्तII1II
संत संतांजीचे घराणे होते विठ्ठल भक्त
लिहिता वाचता येण्याएवढे होते शिक्षण
तुकोबांचे कीर्तन ऐकून झाले प्रभावितII2II
तुकोबा कीर्तनात अभंग रचना ऐकवीत
जगनाडे तुकोबांना करती टाळांची साथ
बुद्धिवान एक पाठी अभंग मुखोद्गतII3II
प्रपंच सोडाया निघाले साधण्या परमार्थ
तुकोबांनी केले परावृत्त अनुग्रहीत
तुकोबांचे सर्व अभंग संताजी लिहीतII4II
संत संताजी करीत प्रवचन कीर्तन
लिहिले अभंग तेलसिंधू शंकर दीपिका ग्रंथ
तुकोबांचे अभंग खजिना संतांनी केले जतनII5II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.