You are currently viewing न्हावेलीतील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री चिंतामणी भजन मंडळ प्रथम

न्हावेलीतील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री चिंतामणी भजन मंडळ प्रथम

सावंतवाडी :

न्हावेली माऊली मंदिरात श्री प्रभू रामनवमीनिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री चिंतामणी प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक मातोंडचे श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ, तृतीय क्रमांक पावशी कुडाळचे श्री ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळाने पटकावला. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक नांदगाव कणकवलीचे श्री देव कोळंबा प्रासादिक भजन मंडळाला तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक कोंडुरा वेंगुल्याचे श्री देव सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळाला देण्यात आले.

उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे- उकृष्ट गायक ओंकार येरम ( श्री वेताळ मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ पोईप मालवण ) उकृष्ट पखवाज आकाश साळगावकर ( श्री देव कोळंबा प्रासादिक भजन मंडळ नांदगाव कणकवली ) उकृष्ट हार्मोनियम प्रथमेश मोरजकर ( श्री ब्राम्हण देव प्रासादिक भजन मंडळ मळेवाड ) उकृष्ट तबला मिहिर नाईक ( श्री चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ सुरंगपाणी ) उकृष्ट झांजवादक काव्या पवार ( श्री ब्राम्हण देव महिला प्रासादिक भजन मंडळ पावशी कुडाळ ) उकृष्ट कोरस ( श्री जैन महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ वालावल कुडाळ ) उकृष्ट गजर प्रभू रामचंद्रावर ( श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ माजगाव ) यांची निवड करण्यात आली.स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना ५,००१ रुपये व सन्मानचिन्ह,द्वितीय क्रमांक ३,००१ रुपये व सन्मानचिन्ह तृतीय क्रमांक २,००१ रुपये व सन्मानचिन्ह उत्तेजनार्थ प्रथम १५०१ रुपये व सन्मानचिन्ह द्वितीय १,००१ व सन्नानचिन्ह तसेच गायक,हार्मोनियम,पखवाज,तबला,झांजवादक,कोरस,गजर प्रत्येकी ५०० रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत नऊ भजन संघानी सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून पुरुषोत्तम परब व सागर वारखणकर यांनी काम पाहिले सूत्रसंचालन संदिप दळवी यांनी केले.या स्पर्धेला अजय नाईक,रोहित निर्गुण,विघ्नेश नाईक,विठ्ठल नाईक,सगुण चव्हाण,सुदन पार्सेकर,गोविंद गावडे आदी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा