सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे इतर क्षेत्राबरोबरच आरोग्य क्षेत्रातील सेवाभावी कार्य कौतुकास्पद.
– ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा देसाई.
आरोग्य अधीक्षकांकडून सुद्धा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला कौतुकाची थाप.
सामाजिक कार्य काय असते हे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून अनुभव अनुभवायला मिळालं कुठच्याही प्रकारच्या अडीअडचणीला वेळ काळ न पाहता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आपला बहुमूल्य वेळ देऊन शहरात तसेच गावामध्ये गरजूंना मदत करते आरोग्य क्षेत्रात सुद्धा ही संस्था रुग्णांना सेवा देण्याचे खूप मोठ कार्य करत आहे त्यांच्या या कार्याचा मला अभिमान वाटतो अशा या सेवाभावी संस्थेला सध्या स्थितीमध्ये प्रथम प्राधान्य देणे मिळणे गरजेचे आहे आरोग्य सोयी सुविधा बाबत अशा या संस्थांना आंदोलन उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये असे ते पुढे म्हणाले.
हि संस्था वेळ काळ न पाहता संकटाच्या वेळेत शहरामध्ये 24 तास विनामूल्य सेवा पुरवते हे मी नाही तर शहरवासीयांनी सुद्धा याचा अनुभव घेतला आहे.
सावंतवाडी मधील प्रत्येक वार्ड अंतर्गत 15 मार्च ते 25 मार्च अशा या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये आयुष्यमान भारत कार्ड योजना व आरोग्य शिबिराचे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय यांच्यावतीने आयोजन केले होते.
या शिबिराचे पूर्ण नियोजन व व्यवस्थापन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडे देण्यात आले होते त्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची रूपा मुद्राळे व शरदनी बागवे शहरातील प्रत्येक वार्डमध्ये वार्ड जाऊन ज्या दिवशी ज्या वार्ड मध्ये शिबिर आहे त्या वार्डमध्ये आदल्या दिवस व शिबिराच्या दिवशी सकाळी सात वाजता जाऊन डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था अगदी काटेकोरपणे पार पाडली.
या शिबिरामध्ये जवळपास दहा हजार लोकांनी या योजनेचा फायदा घेतला असं सांगण्यात आलं. यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे व शरदिनी बागवे यांनी यासाठी बहुमूल्य कामगिरी बजावली या कामगिरी बाबत ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते अण्णा देसाई यांच्याकडून सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते व डॉक्टर, कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले तर डॉ.धीरज चौगुले व समुपदेशक अदिती कशाळीकर यांनी सुद्धा सामाजिक बांधिलकीचे कौतुक करून आभार मानले.
तर यावेळी रूपा मुद्राळे व शरदिनी बागवे म्हणाल्या की सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही एक सेवाभावी संस्था आहे आणि या संस्थेमध्ये काम करताना वेगवेगळे अनुभव येतात ज्यावेळी आमच्याकडून कोणाला मदत होते किंवा आमच्या मदतीमुळे कुणाचं दुःख हलकं होतं त्यापेक्षा मोठं समाधान दुसरा कुठलेही नाही अशा भावना त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा देसाई, अरुण मेस्त्री, डॉ. गिरीश कुमार चौगुले, समुपदेशक अदिती कशाळीकर, डॉक्टर,आयुर्वेदिक कॉलेजचे विद्यार्थी, रूपा मुद्राळे, शरदिनी बागवे, रवी जाधव हॉस्पिटल सिस्टर व कर्मचारी उपस्थित होते.