You are currently viewing शिल्प ग्राम परिसरात मध्यरात्री वीजवाहिन्यावर झाड कोसळले…

शिल्प ग्राम परिसरात मध्यरात्री वीजवाहिन्यावर झाड कोसळले…

शिल्प ग्राम परिसरात मध्यरात्री वीजवाहिन्यावर झाड कोसळले…

सावंतवाडी

येथील शिल्पग्राप परिसरात जाणा-या मुख्य रस्त्यावर झाड पडून वीज वाहिन्या रस्त्यावर कोसळल्या. सुदैवाने हा प्रकार मध्यरात्री घडल्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही
ही घटना रात्री तीन वाजण्याच्या सुमारास घडली याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी नगर परिषद कर्मचारी आणि वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सकाळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिक आणि उन्हाळ्यात हैराण झाले आहेत.. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा पदाधिकारी आशिष सुभेदार यांनी तात्काळ दखल घेत संबंधित महावितरणचे अधिकारी व नगर परिषदेचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधत तात्काळ काम मार्गी लावले व त्या ठिकाणी युद्ध पातळीवर काम सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा