*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कॅमेर्यासोबतच..माझं जगणं..*
तपत्या झळा.. उन्हाच्या
सप्तरंगात कॅमेराचं झेलतोय
सतराशे साठावं भांडण
तोच… उकरून काढतोय..
ताणाचं नवं निमित्त …साधून
वकुबानं झाडाझडती घेतो
बजबजपूरीतून मला ओढून
निर्मितीला साक्षात करतो..
अस्वस्थतेची असंख्य चित्रे
प्रतिमांच्या कॅनव्हासवर रंगवतो
व्यक्तीमत्वाचं कोलाज झूमकरून
कायापालट अभिव्यक्तीचा करतो..
बदलता तोंडवळा माझा
अभावतही उराशी कवटाळतो
स्वप्नपंखाना लेन्समधून बळं..देत
संघर्षातून स्वप्नपूर्तीकडे नेतो..
गतकाळालाही येतो गहिवर
थोडी.. वजा बेरीज ..भागाकार
खेळ मांडला अद्वैताने
जगण्याचा रम्य उतार..
मनकवडा कॅमेरा माझा
दत्तक मला घेतो
अस्तित्वाचं अचूक उत्तर
तोच हल्ली गहिवरतो..!!
बाबा ठाकूर.