You are currently viewing शब्दकळा

शब्दकळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम शिरोमणी काव्य*

 

*शब्दकळा*

 

*शब्दकळा*

कल्पनेला बहर

उमलून येतो मनात

भावनांची उसळते सळसळती

लहर…..

 

*शब्दकळा*

आर्त वेदना

प्रीती विरह दु:ख

प्रगट करते लेखणीतून

संवेदना….

 

*शब्दकळा*

मुग्ध हळूवार

बोलकी कधी अवचित

लखलख चमकणारी दुधारी

तलवार…

 

*शब्दकळा*

अंगाईतून जोजवते

अभंग ओवी भावगीत

वीररस, पोवाड्यातून गरजत

. येते….

 

*शब्दकळा*

कल्पकतेतून लेखनात

शब्दसरीतून अशी बरसते

ठाव घेते रसिकांच्या ह्रदयात…

 

‌‌ *शब्दकळा*

‌अलौकिक भासते

साहित्य ठरते अजरामर

लेखणीतून शब्द सृष्टी

किमयागार ठरते…‌!!

~~~~~~~~~~~~~~~

*अरुणा दुद्दलवार @*✍️

*दिग्रस यवतमाळ*

प्रतिक्रिया व्यक्त करा