You are currently viewing दोडामार्ग येथे पट्टेरी वाघिणीचे दर्शन…  

दोडामार्ग येथे पट्टेरी वाघिणीचे दर्शन…  

दोडामार्ग येथे पट्टेरी वाघिणीचे दर्शन…

दोडामार्ग

येथील जंगलात पट्टेरी वाघिणीचे दर्शन झाले आहे. मालवण तालुक्यातील प्राणी व पक्षी मित्र दर्शन वेंगुर्लेकर आणि अन्य युवक सफारीवर जात असताना त्यांना दोडामार्ग येथील जंगलात पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. त्यांनी हा नजारा आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. या युवकांनी त्या वाघिणीला “सुंदरा” असे नाव दिले. काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी पट्टेरी वाघांचे दर्शन झाले होते. दर्शन वेंगुर्लेकर यांनी याबाबतचा व्हिडिओ एक्स आणि फेसबुक वर अपलोड केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ खूप वायरल होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा