कारिवडेत उद्या गवळदेव मंदिर वर्धापन दिन
सावंतवाडी
कारिवडे गवळीवाडी येथील गवळदेव मंदिराच्या १३ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त मंगळवारी, ८ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी ८ वाजता अभिषेक, पूजा आदी धार्मिक कार्यक्रम, १० वाजता सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५.३० वाजता श्री श्री १०८ महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरू गावडेकाका महाराज यांचे अध्यात्मिक मार्गदर्शन, सायंकाळी ६.३० वाजता कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांचे कोकण संस्कृतीवर व्याख्यान, सायंकाळी ७ वाजता.
मान्यवरांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, रात्री ८ वाजता महाप्रसाद, त्यानंतर लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ (नेरुर) यांचा ‘भूतनाथ’ नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन देव गवळदेव देवस्थान ट्रस्टने केले आहे.