पुणे :
नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय -भोसरी, पुणे वतीने पिं.चि.मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्या आवाहनानुसार दर शनिवारी ‘दप्तरा विना शाळा ‘या उपक्रमांतर्गत कवी वादळकार प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे यांनी पिं.चिं.मनपा च्या १०० प्राथमिक शाळा मध्ये हा विनामूल्य वर्षेभर राबविला.
नक्षत्राचं देणं काव्यमंच हि आपल्या शहरातील उपक्रमशिल संस्था आहे. संस्थेचे हे रोप्य महोत्सवी वर्ष आहे.या संस्थेच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला .म्हणून मराठी भाषेची जोपासना होण्यासाठी .तसेच मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी . मायमराठी ची सेवा घडण्यासाठी विनामूल्य आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिके मधील सर्व प्राथमिक शाळांमध्ये हा उपक्रम आयुक्तांनी केलेल्या आवाहानानुसार राबविण्यात आला.
नक्षत्राचं देणं काव्यमंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कवींना आदर आणि सन्मान मिळावा .कवितेची जोपासना व्हावी .म्हणून गेली पंचवीस वर्षे सातत्यपूर्ण काम करत आहे. कोणत्याही स्वरूपाचं मानधन न घेता विद्यार्थी वर्गामध्ये कवितेची आवड निर्माण होण्यासाठी त्यांच्या मनात कवितेचे बीज फुलण्यासाठी हा उपक्रम संस्थेच्या वतीने विनामूल्य वर्षभर राबविण्यात आला. पिंपरी चिंचवड मनपाच्या प्राथमिक शाळेतील तीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्यात यश आले.
नक्षत्राचं देणं काव्यमंच संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा राजेंद्र सोनवणे यांनी पुढील उपक्रमाची मांडणी केली आहे. त्यात प्रत्येक शाळेमधून दोन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचे लवकरच “बाल
काव्यसंमेलन” घेण्याचे नियोजन करणार आहे. तसेच सादर होणाऱ्या प्रत्येक बालकवीची कविता घेऊन त्याचा *बाल काव्यसंग्रह” सुद्धा प्रकाशित करण्याच्या मनोदय व्यक्त केला आहे.
या उपक्रमाचा विद्यार्थी वर्गाला पुढील प्रमाणे फायदे झाले आहे.कवितेने विद्यार्थी वर्गात व्यक्त होण्याची भावना निर्माण झाली.
कवितेमुळे सर्व विषय समजणे सहज सोपे झाले.
कलासक्त राहण्यासाठी कवितेची जोपासना केली.
कवितेमुळे व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी मदत झाली.
कवितेत ऊर्जा आणि आनंद आहे.याची जाणिव झाली. भावनांची अभिव्यक्ती
म्हणजेच कविता होय.हि संकल्पना रुजवण्यास मदत झाली.कविता प्रत्येकाच्या जीवनात असणे आवश्यक आहे. कवितेने दृष्टिकोन बदलतो.हि भूमिका स्पष्ट झाली. एक तास कवितेचा हा उपक्रम विद्यार्थी वर्गाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारा ठरला.
कवितेमुळे निरीक्षण शक्ती वाढते आणि अभ्यासाची गोडी लागते.हि प्रचिती विद्यार्थ्यांना आली.म्हणून विद्यार्थी वर्गामध्ये काव्याची आणि साहित्याची आवड निर्माण होण्यासाठी प्रा राजेंद्र सोनवणे कवी-वादळकार, पुणे यांनी,”एक तास कवितेचा .. कवी तुमच्या भेटीला” या उपक्रमाने वरील उद्दिष्ट ही साध्य करण्याचा प्रयत्न केला.
सर्व मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका तसेच केंद्रप्रमुख, प्राथमिक शिक्षण विभाग,शिक्षक यांनी या उपक्रमाच्या आयोजन व संयोजनासाठी प्रा.राजेंद्र सोनवणे यांना सहकार्य केले.
हा आनंदी उपक्रम पिं.चि मनपाच्या सर्व आठ हि प्रभागातील प्राथमिक शाळा मध्ये राबविण्यात आला. यामध्ये भोसरी, आकुर्डी, निगडी, मोहन नगर, चिंचवड स्टेशन, चिंचवडगाव, काळेवाडी, वाल्हेकर वाडी, खराळवाडी, यशवंत नगर, नेहरूनगर, जाधव वाडी, बोराडे वाडी, पिंपळे गुरव, कस्पटे वस्ती, वाकड, पुनावळे, मोशी, वडमुख वाडी, चरोली, काळजे वाडी, पठारे मळा, बोरुडे वस्ती, दिघी, लांडेवाडी, डुडूळगाव, तळवडे, सोनवणे वस्ती, म्हेत्रे वाडी, नेवाळे वस्ती, चिखली, अजंठा नगर, कुदळवाडी, श्रमिक नगर, पिंपरी गाव, संतोष नगर, पिंपरी वाघेरे, पिंपळे सौदागर, रहाटणी, भाट नगर, थेरगाव, पिंपरी, थेरगाव, भुमकर वस्ती, फुगेवाडी, दापोडी, कासारवाडी, सांगवी, संत तुकाराम नगर, जाधव वाडी, खराळवाडी, रुपीनगर, पिंपरी नगर, कासारवाडी, वैदु वस्ती, भोसरीगाव , मोशीगाव,इ.परिसरातील मुले व मुली या शाळांबरोबर मराठी, इंग्रजी, उर्दू इत्यादी सर्व शाळांमध्ये हा उपक्रम यशस्वी करण्यात आला. सदर उपक्रम प्रत्येक शनिवारी सकाळ व दुपार या दोन्ही सत्रातील शाळांमध्ये शाळेंच्या वेळेनुसार हा उपक्रम सादर करण्यात आला.
हा उपक्रम सादर होत असताना , प्राणी, पशु, पक्षी, गांधीजी ,झेंडा, कबूतर, चिमणी ,कावळा ,आई वडील ,पर्यावरण, झाडे, फुले, माणुसकी, शाळा, विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कवितांचं सादरीकरण करण्यात कविता लेखन व सादरीकरण याविषयी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले.अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या उत्स्फूर्त रचना सुद्धा सादर केल्या. अनेक विद्यार्थी कविता लिहित असल्यास जाणवले. अनेक शिक्षक सुद्धा आपण कवी असल्यामुळे त्यांनी सुद्धा या उपक्रमात कविता सादर करून कवितेची विद्यार्थी वर्गात आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रत्येक विद्यालयामध्ये “बालकाव्यमंच स्थापन “करण्याचे आवाहन कवी- वादळकार यांनी केले आहे.
नक्षत्राचं देणं काव्यमंच ने यापूर्वी प्राथमिक शिक्षकांसाठी कवी संमेलन घेण्याचा नियोजन केले होते. पुन्हा लवकरच शिक्षकांसाठी सुध्दा काव्यसंमेलन घेण्याचं नियोजन आहे.अशी माहिती संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे. या उपक्रमातून पिंपरी-चिंचवड मनापाच्या शाळेतून अनेक भविष्यातील कवी व लेखक घडतील. असा विश्वास प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केला.