You are currently viewing विचारणा होता धोब्याकडून

विचारणा होता धोब्याकडून

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*विचारणा होता धोब्याकडून*

           

 

बांधून झाला *पूल* आता

*श्रीराम* येणार त्यावरून

स्वप्न साकारले पाच वर्षांत

घेणार श्रीरामाला तो ओवाळून

//1//

रामनामाची जादू भयंकर

तरले दगड *राम* लिहून

श्रध्दा होती म्हणून त्यांची

पूल न गेला कधी *वाहून*

//2//

सेतू बांधून घुसले वानर

नाही लुटली लंका त्यांनी

जरी वधला रावण प्रभूनी

बिभिषणा बसविले सिंहासनी

//3//

नीती अनीतीचा होता दरारा

नव्हती कुठली कूट *खेळी*

पट्टी नसून नयनी कुणाच्या

न्याय पध्दत होती *सोवळी*

//4//

अजून चालते नाणे रामाचे

बिरुद मिरविते सत्य वचन

नाही केली *कोर्ट कचेरी*

विचारणा होता धोब्या कडून

//5//

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा