You are currently viewing रामसेतु:- पवित्र स्थान

रामसेतु:- पवित्र स्थान

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ स्मिता श्रीकांत रेखडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*रामसेतु:- पवित्र स्थान*

दशाननाने कपटाने केले हरण सीतेचे
जटायू सांगे हरण वृतांत रामरायाला
समुद्रापार लंकापतीने केले बंदिस्त
मैथिलीच्या आभुषणाने मार्ग दाखवीला||१||

मंदोदरी करी विरोध महा पंडिताला
अक्षम्य अपराधाचा राम घेईल बदला
सुग्रीवाने दिली आपली शुर वानरसेना
सागरावर लंके पर्यंत सेतु उभारिला ||२||

आक्रमण करूनी आणण्या सीतेला
सागरा करी प्रार्थना मागे मार्ग लंकेचा
रामायण सांगे रामसेतु म्हणजे नलसेतु
नल च्या नेतृत्वात सेनेने सेतु जोडिला ||३||

मोठ्या दगडांवर रामनाम लिहता तरले
खारी ने आणुन रेती पुण्यभाग साधिला
पवित्र स्थान असे रामेश्वरम ज्योतिर्लिंग
धनुष्यकोडी ते लंका सागरी मार्ग केला ||४||

पुर्ण होई सेतु राम राम पावन नाम वदता
असे वंदता चक्रवाताने होई नष्ट रामसेतु
गर्व हरण करण्या रावणा हनुमंत झेप घेई
मुक्त होई सीतामाई रामभक्त बांधता सेतु ||५||

बिभीषण सांगे करतील अन्य राजे आक्रमण
हे रामा,तोड सेतु निघता अयोध्येस असे वदंता
विज्ञान सांगे उपग्रहातुन दिसे भूमी द्विपाखाली
लांब दगडी रेषा प्राचीन काळातील साक्ष देता ||६||

सौ. स्मिता श्रीकांत रेखडे.नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा