परमे सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत वैभव सहकार पॅनलची विजयी घौडदौड…
आमदार दिपक केसरकर, निलेश राणे व संजू परब यांच्या नेतृत्वाखाली गणेशप्रसाद गवस, राजेंद्र निंबाळकर, प्रेमानंद देसाई यांची रणनीती यशस्वी
दोडामार्ग:
येथील परमे गृप विविध कार्यकारी सेवा संस्थेची १३ जागांसाठी पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत आमदार दीपक केसरकर, निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली वैभव सहकार परिवर्तन पॅनलने १० जागा जिंकून निर्वाचित वर्चस्व मिळवीत विरोधी सहकार उत्कर्ष पॅनलला पराभवाची धूळ चारली.
दरम्यान या विजयाबद्दल शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाप्रमुख संजू परब यांनी उमेदवारांचे तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
परमे सोसायटीच्या निवडणुकीत जिल्हाप्रमुख संजू परब, दोडामार्ग तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस, सावंतवाडी विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रेमानंद देसाई, राजेंद्र निंबाळकर यांसह गोपाळ गवस यांची रणनीती कामी आली. वैभव सहकार परिवर्तन पॅनलचे उमेदवार शैलेश दळवी यांना २८७ मते, रामकृष्ण सावंत यांना २७४ मते, लक्ष्मण मयेकर यांना २६७ मते , वासुदेव नाईक यांना २६४ मते, गणेश धुरी यांना २५७ मते, आत्माराम देसाई यांना २५३ मते, विजय जाधव यांना ३०० मते, दत्ताराम जंगले यांना २८६ मते, संगीता वेटे यांना ३२५ मते, रामदास मेस्त्री २९२ मतांनी विजयी झाले.