You are currently viewing पीएम श्री बांदा नं.१ केंद्र शाळेत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

पीएम श्री बांदा नं.१ केंद्र शाळेत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

*पीएम श्री बांदा नं.१ केंद्र शाळेत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ*

*बांदा*

उपक्रमशील शाळा म्हणून ख्याती असलेल्या जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेत सन २०२५-२६या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे.
राज्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ख्याती असलेल्या या शाळेची निवड केंद्र सरकारने पीएम श्री योजनेसाठी केलेली असून चालू वर्षी शाळेत पहिली इयत्तेसाठी सीबीएसई अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे.पीएम श्री योजनेअंतर्गत शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध होत असून या सर्व साधनांचा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.सुसज्ज संगणक लॅब, रोबोटिक्स लॅब, प्रयोगशाळा,संगीत वर्ग, क्रीडा साहित्य अशा प्रकारे विविध प्रकारच्या भौतिक सुविधासह मोफत पाठ्यपुस्तके,शालेय गणेश, मध्यान्ह भोजन,अभ्यासदौरा , विविध डिजिटल साहित्याचा वापर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा विविध सुविधा विद्यार्थ्यांना मोफत मिळणार आहे.यासाठी पालकांनी आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पीएम श्री बांदा केंद्र शाळेत प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे व उपाध्यक्ष संपदा सिध्दये यांनी केले असून. शाळा प्रवेशासाठी मुख्याध्यापक शांताराम असनकर 7350715713 व उपशिक्षक जे.डी.पाटील 8605703103 यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा