बाळाच्या डोक्यात बसवण्यात येणाऱ्या त्या पाईपची किंमत ९० हजार तर दानशुरांनी खात्यात जमा केले तब्बल १०८००० हजार.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केले होते आवाहन दानशुरांचे मानले मनःपूर्वक आभार.
त्या बाळाच्या पालकाकडून मदत थांबवण्याचे दानशुरांना नम्र आवाहन वेळेत मदत केल्याबद्दल दानशुरांचे कुटुंबीयांनी मानले आभार.
चांगल्या दर्जाचा तो डोक्यात बसवण्यात येणाऱ्या पाईप ची किंमत 90 हजार रुपये होती व तो मुंबईत वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे बाहेरून मागवण्यात आला असे त्या बाळाच्या वडिलांनी सांगितले आणि हे केवळ सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व दानशुरांच्या मदतीमुळे शक्य झाले दोन दिवसातच दानशुरांनी तब्बल एक लाख आठ हजार रुपये इतकी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये तातडीने जमा केली हा आमच्यासाठी एक सुखद धक्काच होता असे ते म्हणाले.
बाळाला थोडासा ताप असल्यामुळे ताप कमी झाल्यावर लगेचच ऑपरेशनला घेऊ असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
कोकणी माणसाची परिस्थिती कधीही हलाक्याची असली तरी कोकणातील गरीब कुटुंबातील माणूस कधीच कोणाचा गैरफायदा घेत नाही याचं उदाहरण समोरच आला आहे. अत्यंत गरीब परिस्थिती असलेले सिंधुदुर्ग जिल्हा, कुडाळ तालुका तुळसुली गावांमधील ते मोलमंजुरी करून जीवन जगणारे एक गरीब कुटुंब आणि त्यांच्या नशिबी आलेलं त्या बाळाचं गंभीर आजारपण यात ते दांपत्य त्या बाळाच्या आजारपणात पूर्णपणे होरपळून निघाले होते काय करावं त्यांना काहीच सुचत नव्हतं अशावेळी त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान चे रवी जाधव यांना हाक दिली त्यानंतर रवी जाधव यांनी केलेल्या आव्हानाला दानशूर व्यक्ती त्या गरीब दांपत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्या बाळाचा प्राण वाचवण्यासाठी सढळ हाताने मदत केली.दानशूर कायम सुखी राहावेत अशी त्यांच्या कुटुंबाकडून दानशुरांसाठी प्रार्थना करण्यात आली.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी दानशुरांचे मनःपूर्वकआभार मानले.