साटेली-भेडशीत उद्या बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर..
दोडामार्ग
बांधकाम कामगार कल्याणकारी संघ यांच्यावतीने “तपासणी ते उपचार” या योजनेंतर्गत इमारत बांधकाम कामगारांसाठी उद्या साटेली-भेडशी चर्च येथे सकाळी १०.३० वा. मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीराचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार कल्याणकारी संघ यांच्यावतीने करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संचालक सदस्य सौ. जेनीफर लोबो (9623672139), बांधकाम कामगार कल्याणकारी संघ सदस्य दिपक जाधव (9422778815) यांच्याशी संपर्क साधवा.