You are currently viewing तुझ्या फोटोकडे

तुझ्या फोटोकडे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम ओळकाव्य*

 

*तुझ्या फोटोकडे*

 

 

*चोरून तुला बघतांना*

मन होते सैरभैर

प्राणप्रिय सखा माझा

कोणाशीच नसे वैर

 

प्रश्न अनेक मनात

*चोरून तुला बघतांना*

साधी सरळ राहणी तुझी

चित्त सदा प्रभूचिंतनात

 

 

सांगायचे आहे कितीतरी

दूर जरी असलासी

*चोरून तुला बघतांना*

स्मरणात तू अससी

 

 

मन झाले वेडे माझे

स्पर्श तुला करतांना

पाहिले तुला हसतांना

*चोरून तुला बघतांना*

 

 

 

प्रतिभा पिटके

अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा