You are currently viewing कोलगाव मध्ये ग्रामसंघ समन्वय समिती ची स्थापना

कोलगाव मध्ये ग्रामसंघ समन्वय समिती ची स्थापना

कोलगाव मध्ये ग्रामसंघ समन्वय समिती ची स्थापना

सावंतवाडी

पंचायत राज संस्था व समुदाय आधारित संघटना कृतीसंगम प्रकल्प(PRI CBO Convergence) अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान-उमेद व कुटुंब श्री केरळ यांच्या पुढाकाराने कोलगाव येथे *ग्रामसंघ समन्वय समिती* ची स्थापना करण्यात आली. या समितीच्या *समन्वयक म्हणून श्रीम.सविता शिवाजी कासार (चैतन्य ग्रामसंघ,भोम) व लिपिका म्हणून श्रीम.दीप्ती दत्तप्रसाद शेटकर (विकास ग्रामसंघ, निरुखे)* यांची निवड करण्यात आली.
ग्रामसंघ समन्वय समिती(VOCC) व ग्रामपंचायत समन्वय समिती(GPCC) याविषयी
*कुडुंब श्री केरळच्या मेंटॉर श्रीम. गिरिजा संतोष व सावंतवाडी तालुक्यासाठी कार्यरत असणाऱ्या BRPश्रीमती प्राची राऊळ* यांनी मार्गदर्शन केले.
*ग्रामसंघ,ग्रामपंचायत व विविध विभाग यांच्या समन्वयातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातील दुर्लक्षित घटकांना मिळवून देणे तसेच त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम या प्रकल्पातून होणार आहे.*

यावेळी कोलगाव प्रभागातील कोलगाव,कारीवडे, आंबेगाव, कुणकेरी या ग्रामपंचायती अंतर्गत येणारे सर्व ग्रामसंघाचे पदाधिकारी व समूहांसाठी काम करणाऱ्या प्रेरिका उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा