मुंबई :
कोकणातील देवगड, मालवण, सावंतवाडी, राजापुर, चिपळुण, गुहागर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गातील अनेक ठिकाणचा कोकणचा राजा हापुस आंबा, पायरी आंबा, कलमी आंबा यांची वेगळीच चव असते. पण अस्सल चवीचा आंबा मुंबईच्या ठिकाणी थेट ग्राहकांना मिळणे दुरापास्तच. हेच बघुन शेतकरी ते थेट ग्राहक ही योजना राबवित असून या योजनेअंतर्गत मुंबईत भांडुप व मुलुंड येथे कोकण विकास परिवार या संस्थेच्या वतीने दिनांक १८ एप्रिल ते १ मे २०२५ (१४ दिवस) भांडुप पश्चिम या कालावधीत बीएमसी राखीव जागा, बीट पोलीस चौकीच्या बाजूला, व्हिलेज रोड, भांडुप पश्चिम मुंबई येथे शेतकरी ते थेट ग्राहक आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना आपला आंबा व त्यावर प्रक्रिया करून कोकणातील इतर वस्तू थेट ग्राहकांना विकायचा असेल व दलालांकडुन आंब्याची होणारी दरवाढ कमी करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवानी व विक्रेत्यांनी त्वरीत आपला स्टाॅल आरक्षित करावा, अधिक माहीतीसाठी सुजय धुरत ९९८७१७३०३४ या नंबरवर संपर्क करावा ही विनंती.