You are currently viewing उद्यापासून वराड येथे राणे महाराज मठात रामनवमी उत्सव व पुण्यतिथी उत्सव सोहळा

उद्यापासून वराड येथे राणे महाराज मठात रामनवमी उत्सव व पुण्यतिथी उत्सव सोहळा

मालवण :

मालवण तालुक्यातील वराड कुसरवे येथील प.पू.राणे महाराज मठात रविवार 6 एप्रिल व 7 एप्रिल रोजी रामनवमी उत्सव व प.पू. श्री राणे महाराज यांचा 10 वा पुण्यतिथी उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित रविवार 6 एप्रिल रोजी रामनवमी उत्सवनिमित स. 9 वा. मूर्ती अभिषेक, स. 10 वा. ह. भ. प. कु. मधुरा मिलिंद सावंत , माजगाव यांचे रामजन्म कीर्तन, दु. 12 वा. रामजन्म, दु. 1 वा. महाआरती, दु. 1.30 वा. अखंड महाप्रसाद, दु. 4.30 वा. स्थानिक भजने, सायं. 6 वा. महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा सन्मान नारीशक्तीचा निवेदिका ॲड. प्रणिता राऊळ – कोटकर, रात्रौ 8 वा. समर्थ प्रासादिक भजन मंडळ कट्टा यांचे संगीत भजन. सोमवार 7 एप्रिल रोजी प.पू. राणे महाराज यांच्या दहाव्या पुण्यतिथी उत्सव निमित्त स. 9 वा. राणे महाराज यांच्या पादुकांवर अभिषेक, स. 10 वा. नामदेव महाराज भक्तमंडळी, सिंधुदुर्ग यांचा हरिपाठ व भजन, दु.1 वा. महाआरती, दु. 1.30 वा. अखंड महाप्रसाद, सायं. 4 वा. कै. श्री. गुरुनाथ म्हाडगुत यांचे घर ते प. पू. राणे महाराज मठ पर्यंत पालखी मिरवणूक सोहळा, रात्रौ. 8. वा. दत्तमाऊली दशावतार लोककला नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा मयुरेश्वर हा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प. पू. राणे महाराज सेवा ट्रस्ट यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा