You are currently viewing ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मदर क्वीन्सचे उज्ज्वल यश

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मदर क्वीन्सचे उज्ज्वल यश

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मदर क्वीन्सचे उज्ज्वल यश

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत उज्ज्वल यश संपादित केले.प्रशालेचा इयत्ता दुसरीत शिकणारा विद्यार्थी कु.प्रणीत मडगावकर याने 100 पैकी 89 गुण प्राप्त करून सुवर्ण पदक पटकावले. तसेच इयत्ता चौथीतील विद्यार्थी कु. विहान टोपले याने 100 पैकी 81 गुण प्राप्त करून रजत पदक पटकावले.
या यशाबद्दल सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व संस्थेचे सदस्य, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी व पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी कौतूक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा